Download App

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्ता 53 टक्के होण्याची शक्यता, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Pratap Sarnaik Announces ST employees Dearness allowance likely to be 53 percent : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये (ST employees Dearness allowance) लवकरच वाढ होणार, अशी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा (Transport Minister Pratap Sarnaik) केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 53 टक्के होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

परिवहन मंत्र्‍यांनी माणगावमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना एसटी कर्मचाऱ्यांना (ST employees) खुशखबर दिली. सरनाईकांच्या या घोषणेनंतर एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदचं वातावरण आहे. याच महिन्यात मंत्रालयात बैठक घेऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यासंदर्भातील मागणीवर निर्णय घेतला जाईल, हे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलंय.

यावर्षी वेळेआधीच केरळमध्ये मान्सून धडकणार; वाचा, महाराष्ट्रात कधी पोहोचणार?

माणगाव इथं महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी संघटनेच्या राज्यव्यापी अधिवेशनाला सुरुवात झाली. यावेळी प्रताप सरनाईक बोलत होते. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून ५३ टक्के करावा, अशीमागणी आहे. याबाबत सरकार सकारात्मक आहे, असं परिवहन मंत्र्‍यांनी सांगितलं आहे. एसटीच्या ताफ्यामध्ये दरवर्षी 5 हजार याप्रमाणे ५ वर्षामध्ये 25 हजार नवीन लालपरी बस दाखल होतील , असं देखील प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.

मराठवाड्यात अवकाळी पावसाचं थैमान; वादळी वाऱ्यासह गारांच्या धारा, पिकांचं अतोनात नुकसान

सध्या अपघातांचं प्रमाण वाढतंय. मोबाईलवर बोलत असल्यामुळे किंवा नशेत गाडी चालवल्याने अपघात होतात. हे अपघात टाळण्यासाठी ड्युटी संपल्यावर घरी गेल्यानंतर एकच्या जागी दोन-तीन चपटी घ्या, असा सल्ला मंत्री भरत गोगावले यांनी एसटी चालकांना दिला आहे. अपघात टाळण्यासाठी मोबाईलवर बोलताना गाडी बाजूला उभी करा. त्यानंतर मोबाईलवर बोलणं पूर्ण करा. त्यानंतर पुढे जा, असं देखील मंत्री भरत गोगावले यांनी म्हटलंय. त्यांच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

 

follow us