ST Bus : ‘त्या’ आदेशानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित; प्रवाशांना दिलासा

ST Bus : ‘त्या’ आदेशानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित; प्रवाशांना दिलासा

ST Employees Strike in Maharashtra : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या (ST Employees) विविध मागण्यांसाठी सुरू करण्यात आलेले आंदोलन मागे घेण्यात आले आहे. राज्य सरकारने कामगारांच्या मागण्यांसंदर्भात समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर 13 सप्टेंबरपासून पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

बेरोजगारांच्या जखमेवर मीठ; कंत्राटी भरतीचा जीआर आला, आमदारावर सरकार मेहेरबान

महामंडळातील मान्यताप्राप्त कामगार संघटनेने कालपासून उपोषण सुरू केले होते. मागण्या मान्य केल्या नाहीत तर 13 सप्टेंबरपासून प्रत्येक जिल्ह्यात काम बंद करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभुमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उद्याोगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्यात बैठक झाली. या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर कर्मचाऱ्यांचे उपोषण आणि आंदोलन स्थगित करण्यात आले.

एसटी कर्मचाऱ्यांना एकूण 8 टक्के महागाई भत्ता वाढ मिळावी ही मागणी होती. त्यानुसार आता महागाई भत्ता 34 टक्क्यांवरून 41 टक्के देण्यात येणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांची जी थकबाकी आहे त्यासंदर्भात 15 दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मंत्री सामंत यांनी दिले. पहिल्या दिवशी मंत्री सामंत यांनी कामगारांशी चर्चा करत त्यांच्या काय मागण्या आहेत याची माहिती घेतली होती. त्यानंतर निर्णय मात्र घेतला नव्हता. त्यानंतर आज मात्र कामगारांच्या मागण्यांसंदर्भात समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे कामगारांनी काही काळासाठी उपोषण स्थगित केले आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? तटकरेंनी सांगितलं नेमकं काय ठरलं

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube