Download App

राज्याचं पावसाळी अधिवेशन खोके सरकारच्या निरोपाचं ठरणार; उद्धव ठाकरेंची तिखट टीका

Uddhav Thackeray यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनावरून राज्यातील शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारवर टीका केली आहे.

Uddhav Thackeray Criticize Shinde Fadanvis and Ajit Pawar : उद्यापासून राज्याच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. यावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी राज्यातील शिंदे, फडणवीस आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सरकारवर टीका केली आहे. उद्याचं अधिवेशन हे या खोके सरकारच्या निरोपाचा अधिवेशन ठरणार असल्याची तिखट टीका ठाकरेंनी यावेळी केली.

राज्यात पुन्हा डबल इंजिन सरकार येणार; चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा

मुंबई पदवीधर मतदार संघाच्या मतदानासाठी आले असताना मतदानानंतर ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना अधिवेशनावर प्रश्न विचारण्यात आले असता. ठाकरे म्हणाले की, उद्यापासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होत आहे. हे अधिवेशन या सरकारच्या निरोपाचं अधिवेशन असणार आहे. त्यामुळे मी देखील उद्यापासून सभागृहात असेलच. असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Parliament Session : ओम बिर्लांकडून आणीबाणीची आठवण, विरोधकांचा गोंधळ

दरम्यान या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल रात्री मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मोठी बैठक झाली. तब्बल दीड तास ही बैठक सुरू होती. या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशन, राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य आणि मंत्रिमंडळ विस्तार यांसह अन्य महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.

अधिवेशन काळात आता विरोधक जास्त आक्रमक होतील. त्यांचा आक्रमकपणा कसा रोखायचा याबाबत रणनीतीवर बैठकीत चर्चा करण्यात आली. या तिन्ही नेत्यांत याआधीही अशा अनेक बैठका झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर ही बैठक झाल्याने महत्वाची ठरली. विधानपरिषदेची निवडणूक आणि पुढील विधानसभेची निवडणूक यावरही तिन्ही नेत्यांत चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

follow us

वेब स्टोरीज