Download App

‘नार्वेकरांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला’; उद्धव ठाकरेंची विधानसभा अध्यक्षांवर सडकून टीका

Udhav Thackeray On Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांनी निर्लज्जपणाचा कळस गाठल्याची सडकून टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी केली आहे. दरम्यान, नूकताच अपात्र आमदार प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकाल जाहीर केला आहे. या निकालानंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांसह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर निशाणा साधला आहे. निकालानंतर ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

Fighter Movie: IMDb द्वारे 2024 मधील सर्वाधिक प्रतीक्षा असलेल्या भारतीय सिनेमांची घोषणा

उद्धव ठाकरे म्हणाले, आजच्या निकालामुळे एक गोष्ट प्रश्नाकिंत झाली असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी लोकशाहीची यांनी हत्या केलीयं. त्यांनी पक्षांतर बंदी कायदा मजबूत करण्यापेक्षा राजमार्गच दाखवून दिला आहे. नार्वेकरांनी शिंदेंची भेट घेतली तेव्हाच निकाल कळाला होता. नार्वेकरांची मिलीभगत हे त्यांचं वागणंच दाखवतं. लोकशाहीचा खून करण्यासाठी हे कटकारस्थानच असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हणाले आहेत.

Government Schemes : एकलव्य आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

तसेच राहुल नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालालाही जुमानलं नाही. मूळ केस ही अपात्रतेची होती पण त्यांनी अपात्र कोणालाच केलं नाही. शिवसेना कोणाची हे लहान पोरगं पण सांगू शकतं. निर्णय देताना नार्वेकरांचा पाय चुकला त्यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला. सर्वोच्च न्यायालयाचा त्यांनी अवमान केला आहे, त्यांच्यावर सुमोटो कारवाई न्यायालयाने करावी, अशी मागणीच उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Sanjay Raut : ‘अपात्रतेआधीच मॅच फिक्स, निर्णय दिल्लीत झालाय’; राऊतांच्या आरोपाने खळबळ!

दरम्यान, आम्ही आता न्यायालयीन लढाई लढणार असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात आम्ही न्यायालयात आव्हान देणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचा मोठा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. याशिवाय भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून केलेली नियुक्तीही नार्वेकर यांनी ग्राह्य धरली आहे. त्यामुळे आता शिवसेना एकनाथ शिंदेंचीच असून पक्षाचे चिन्हही त्यांच्याकडेच राहणार आहे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

शिवसेना आमदार अपात्रता याचिकेवर आज रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना याबाबतचे निरीक्षण नोंदविले. यावेळी त्यांनी आमदार अपात्रतेचा निर्णय देण्यापूर्वी खरी शिवसेना कोणाची यावर निर्णय देणार असल्याचे नार्वोेकर यांनी सांगितले होते, त्यानुसार त्यांनी शिवसेनेची घटना, पक्ष संघटना आणि बहुमत या गोष्टींचा आधार घेत खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे निर्णय दिला.

follow us