Government Schemes : एकलव्य आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

Government Schemes : एकलव्य आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

Government Schemes : होतकरु व गरीब विद्यार्थ्यांना (students)पदव्युत्तर पदवीचे (Master’s degree)शिक्षण पूर्ण करता यावे, यासाठी एकलव्य आर्थिक सहाय्य योजना (Eklavya Financial Assistance Scheme)सुरु करण्यात आली आहे. ही योजना सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी लागू असणार आहे. राज्य शासनाकडून (State Govt)ऑफलाईन पध्दतीने 1995-96 या शैक्षणिक वर्षापासून एकलव्य आर्थिक सहाय्य योजना सुरु केली आहे. होतकरु व गरीब विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करता यावे, यासाठी शासनाने ही योजना सुरु केलेली आहे.

Ayushmann Khurrana: ‘2024 मध्ये अनोख्या शैलींचा प्रयोग करणार, अभिनेत्याचा खुलासा म्हणाला…

योजनेच्या प्रमुख अटी :
– विधी, वाणिज्य व कला शाखेमध्ये किमान 60 टक्के व विज्ञान शाखेकरिता किमान 70 टक्के पदवी अभ्यासक्रमामध्ये गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
– लाभार्थ्यांचे पालकांचे वार्षिक उत्पन्न 75 हजार रुपयांपेक्षा कमी असावे.
– सदर विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
– संबंधित लाभार्थी कुठेही पूर्ण किंवा अर्धवेळ नोकरी करणारा नसावा.

Ayushmann Khurrana: ‘2024 मध्ये अनोख्या शैलींचा प्रयोग करणार, अभिनेत्याचा खुलासा म्हणाला…

लाभाचे स्वरूप : पदव्युत्तर स्तर (दोन वर्ष) साठी : प्रतिवर्ष 5000 रुपये. सदर रक्कम ही भारतीय स्टेट बँक ॲाफ इंडिया पुणे कोषागार शाखा, पुणे यांच्यामार्फत विद्यार्थ्यांच्या बँक खातेवर थेट (NFT) जमा करण्यात येते.

संपर्क कुठे साधावा? : उच्च शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, ससून सर्वोपचार रुग्णालयाजवळ, पुणे स्टेशन, पुणे -411 001.

अर्ज करण्याची पद्धती : नवीन मंजुरी/नूतनीकरणासाठी ऑफलाईन अर्ज स्विकारण्यात येतात.
– ज्या विद्यार्थ्यांस नवीन (Fresh) शिष्यवृत्ती मंजूर झालेली आहे अशा विद्यार्थ्यांना पुढील वर्षाचे अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यानंतर नुतनीकरणाचा अर्ज करणे आवश्यक आहे.
– विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयामार्फत संचालनालयास सादर करणे आवश्यक आहे.

(टीप : योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात, तरी वाचकांनी सदर माहितीची पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज