Download App

दिलीप वळसे पाटील साहेबांनी आम्हाला मोठं केलंय, तालुक्याचा विकास केलाय ; विष्णू काका हिंगे

  • Written By: Last Updated:

Vishnu Kaka Hinge Speech For Dilip Walse Patil : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय नेते आपापला प्रचार करण्यात व्यस्त आहेत. आंबेगाव विधानसभा (Assembly Election 2024) मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांचा देखील प्रचार अन् जाहीर सभा सुरू आहे. यावेळी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या गावभेट दौऱ्यानिमित्ताने ते नारोडीमध्ये होते. यावेळी विष्णू काका हिंगे यांनी आपल्या भाषणातून विरोधकांवर हल्लाबोल केलाय.

यावेळी बोलताना विष्णू काका हिंगे म्हणाले की, 1990 पूर्वी मागास असलेला आंबेगाव तालुका आज बारामती पाठोपाठ राज्यात गणला जातो. राज्यात ग्रामीण भागातील एकमेव इंजिनिअरिंग कॉलेज साहेबांनी आपल्या तालुक्यात आणलं. जे तालुक्यात घडलंय ते साहेबांच्या माध्यमातून घडलंय, साहेबांच्या कष्टातून घडलंय. साहेबांच्या सोबत आम्ही अनेक कार्यकर्ते घडलो. आम्हाला मोठं कोणी केलं असेल, तर ते साहेबांनी मोठं केलंय असं देखील विष्णू काका हिंगे भरसभेममध्ये म्हणाले आहेत.

निलंगा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जात नाही; जनताचं सर्वांना उत्तर देईन, निलंगेकरांचा प्रचार जोरात

इतर साखर कारखान्यांमध्ये बघा, घरणेशहीचेच चेअरमन आहेत. पण आंबेगाव तालुक्यात साहेबांनी सर्वसामान्य घरातील कार्यकर्त्याला चेअरमन केलंय. कार्यकर्त्याला न्याय द्यायचा म्हणून यांना चेअरमन केलं. ज्यांनी तुम्हाला उभे केलं त्यांना तुम्ही आज काहीही बोलता, असा टोला देखील विष्णू काका हिंगे यांनी लगावला आहे. खा. कोल्हे यांना आपण खर्च करून निवडून आणलं. तुम्ही राजकारणावर, विकासावर बोला. पण साहेबांची वैयक्तिकरित्या जर कोणी बदनामी करणार असेल, तर त्याला त्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल हे लक्षात ठेवा, असा इशारा विष्णु काका हिंगे यांनी आपल्या भाषणातून इशारा दिलाय.

आंबेगावचे नंदनवन करण्यात वळसे पाटलांचा सिंहाचा वाटा; कुटुबियांना विजयाचा पूर्ण विश्वास

चिकुच्या झाडाखाली झोपलेल्या माणसाला मी राजकारणात आणलं, असं देखील विष्णु काका हिंगे म्हणाले आहेत. एका सर्वसाधारण शेतकऱ्याच्या मुलाला मोठं करत असताना तुम्ही काहीही बोलायला लागले. हे चुकीचं आहे, असं करू नका. तुम्हाला उभं राहायचं तर राहा पण तुम्ही साहेबांची बदनामी करण्याचा प्रयत्न करणार असेल, तर त्याला त्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल याची नोंद घ्यावी, असं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष विष्णु काका हिंगे म्हणाले आहेत.

 

follow us