आंबेगावचे नंदनवन करण्यात वळसे पाटलांचा सिंहाचा वाटा; कुटुबियांना विजयाचा पूर्ण विश्वास
मंचर : आंबेगाव तालुका आदिवासी व दुष्काळी तालुका पण दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) 1990 पासून या तालुक्याचे नेतृत्त्व करून लागले आणि त्यांनी आंबेगाव तालुक्याचे नंदनवन केले. भैतिक सुविधा या तालुक्यात नाही असे एकही गाव नसून, शेतकऱ्यांच्या शेतात पाणी खेळत असल्याने आंबेगाव तालुक्याचे रूप बदलून गेले आहे. साहेबांच्या या कामामुळेच सर्वसामान्य जनता वळसे पाटलांच्या पाठीशी आहे. त्यामुळे ते नक्की निवडून येतील असा विश्वास पूर्वा वळसे पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्या आंबेगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये आयोजित कोपरा सभेत बोलत होत्या.
आपल्याला आणखी प्रगती करायचीये; सोडवलेल्या प्रश्नांचा वळसे पाटलांनी वाचला पाढा
पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या की, वळसे पाटलांचे आंबेगाव तालुक्यासाठीचे योगदान हे पृथ्वी मोलाचे आहे. त्यामुळे ते निवडून येतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आज आंबेगाव तालुका विविध विकासकामांमुळे राज्यात ओळखला जात आहे. हे तालुक्याला वैभवाचे दिवस सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे अहोरात्र कष्ट आणि दूरदृष्टी यामुळे आले आहेत असे वळसे पाटील यांच्या पत्नी किरण वळसे पाटील यांनी सांगितले.
…म्हणून वळसे पाटलांनी पवारांची साथ सोडली; आढळरावांनी सांगितली ‘अंदर की बात’
किरण वळसे पाटील म्हणाल्या की, शेतकऱ्यांच्या जुनाट झोपड्या, कौलारू घरे जाऊन त्या ठिकाणी बंगले उभे राहिले. ही क्रांती एका दिवसात झालेली नाही तर, त्यामागे साहेबांचे अहोरात्र कष्ट आणि दूरदृष्टी आहे. यापुढेही तालुक्याला वैभवाच्या शिखरावर न्यायचे असेल तर, तुम्ही साहेबांच्या पाठिशी उभे राहा असे आवाहन किरण वळसे पाटील यांनी केले.
आंबेगावात वळसे पाटलांचाच गाजावाजा; सर्व्हेतून संपूर्ण चित्र स्पष्ट
यावेळी शरद बँकेचे संचालक दत्ता थोरात, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक निलेश थोरात, सुहास बाणखेले, बाळासाहेब शिंदे उपसरपंच आशा वाळुंज, मारुती नाना डोके, संतोष कडूसकर, राजेंद्र कडदेकर, कल्पना कडदेकर, बाळासाहेब पिंगळे, योगेश पिंगळे, अतुल ठोसर, अक्षदा शिंदे आदी ग्रामस्थ व मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.