पुढच्या पिढ्यांचा विचार करून वळसे पाटलांकडून तालुक्याचा विकास : आढळराव पाटील
मंचर : वळसे पाटलांनी 35 वर्षे आंबेगाव तालुक्याचा परिपूर्ण विकास तुमच्या पुढच्या पिढ्यांचा विचार करून केला आहे, असे प्रतिपादन ‘म्हाडा’चे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले. ते तालुक्यातील भावडी, कोरेगाव येथे आयोजित गावभेट दौऱ्यावेळी बोलत होते.
आंबेगावच्या विकासासाठी वळसे पाटलांचीच गरज : आढळराव पाटील
आढळराव पाटील म्हणाले की, मतदार संघाचा रचनात्मक विकास करण्याचे काम वळसे पाटलांनीच केले आहे. मात्र, आजचे राजकारण एक चुकीच्या पद्धतीने फिरायला लागल्याचे आढळराव पाटील म्हणाले. स्वाभिमान, निष्ठा, भावना याच्या विचारातून आपण विकासापासून दूर जातो असे म्हणत भावनेच्या आहारी जाऊन लोकसभेला जी चूक केली ती या निवडणुकीत करू नका असे आवाहनही आढळराव पाटील यांनी गावकऱ्यांना केले.
आंबेगावात वळसे पाटलांचाच गाजावाजा; सर्व्हेतून संपूर्ण चित्र स्पष्ट
कामे करणाऱ्यांच्या मागे उभे रहा. प्रत्येक उमेदवार तुम्हाला आश्वासन देतो पण निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींनी ते काम केलंय का ते पहा
शेतकऱ्यांचं मागणं हे पाण्याचं असत. 35 वर्षांपूर्वी आंबेगाव तालुका दुष्काळी होता. मात्र, आता बहुतांशी तालुका हिरवागार झाला आहे. सातगाव पठारावरील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी वळसे पाटलांनी प्रमाणिक प्रयत्न केल्याचेही आढळराव म्हणाले. निवडणुकीनंतर सातगाव पठाराला पाणी मिळण्याचे काम चालू होणार म्हणजे होणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. डिंभे धरणाचा बोगदा रद्द करण्याचे श्रेयही वळसे पाटलांनाच जाते असेही ते म्हणाले.
निवडणुकीनंतर राजकीय समीकरणं बदलणार, गणितं जुळवायला खूप वाव ; दिलीप वळसे पाटील
वळसे पाटील म्हणाले की, महाराष्ट्राचे प्रश्न सोडवत असताना आपल्या मतदार संघाकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी मी घेतली. मी लोकांच्या सुख दुःखात आलो नसेलो तरी मी लोकांच्या समस्या सोडविण्यात कधी कमी पडलो नाही. निवडणुकीनंतर सौरंग्या डोंगराच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम चालू होणार असून, यासाठी दहा लाख रूपये मंजूर व रस्ता अधिक चांगला करण्यासाठी एक कोटी रूपये मंजूर झाले आहेत. कलमोडीच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून, लवकर काम चालू होईल असे वळसे पाटील (Dilip Valse Patil) म्हणाले.
जनतेच्या हितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करणार; वळसे पाटलांची ग्वाही
केंद्र सरकारने देशभर कोल्ड स्टोरेज बांधण्याची योजना काढली असून त्याला अनुदान देण्याची योजना आणली आहे. त्यानुसार सातगाव पठार भागात कोल्ड स्टोरेज निर्माण झाल्यास त्याचा फायदा येथील शेतकऱ्यांना होईल. त्यामुळे मतदारांनी भावनेच्या आहारी जाऊन मतदान करू नये. तुम्ही मत दिल्यावर मी बांधील राहतो असेही वळसे पाटील म्हणाले.