‘पाणी पळवण्याचं षडयंत्र, म्हणून वेगळी भूमिका घ्यावी लागली’, दिलीप वळसे पाटलांनी केला मोठा गौप्यस्फोट
Dilip Valse Exclusive Interview letsupp Marathi : राज्यात विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर येवून ठेपल्या आहेत. दरम्यान राजकीय नेत्यांच्या मुलाखती, भेटीगाठी, दौरे वाढलेले आहेत. आंबेगाव विधानसभा (Assembly Election 2024) मतदारसंघात महायुतीकडून सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना (Dilip Valse Patil) उमेदवारी देण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटील यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय गौप्यस्फोट केले आहेत, यावेळी दिलीप वळसे पाटील यांच्याशी जेष्ठ पत्रकार अविनाश थोरात यांनी संवाद साधलाय.
दिलीप वळसे पाटील म्हणाले की, गाठीभेटी घेवून मतदारांचा आशीर्वाद मागणं ही एक बाब आहे. आणि गाठीभाठी घेणं आवश्यक आहे. कारण अनेकवेळा ज्या गोष्टी जाहीर प्रचारात बोलता येत नाही. काही व्यक्ती रूसलेल्या असतात, नाराज असतात. या लोकांना वैयक्तिक भेटावं लागतं असं दिलीप वळसे पाटील म्हणाले आहे. आंबेगाव हा दुष्काळी तालुका म्हणून पाहिलं जातं. कुकडी प्रकल्पाचं पाणी जुन्नर, आंबेगाव, शिरूर या सगळ्या तालुक्यांना मिळालंय लागलं. त्यानंतर शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड सुरू केली. यातून त्यांना नफा झाला. इतर पिकेही शेतकरी घेतात त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्याकडे कल गेला. मंचरची गोवर्धन डेअरी दरदिवशी 20 लाख लिटर दूध प्रोसेस करते, उत्पन्नाचं खात्रीशीर साधन असल्यामुळे सुबकता आलीय, असं दिलीप वळसे म्हणाले आहेत.
“राहुल गांधी अन् काँग्रेसच्या नौटंकीला कुणीच भुलणार नाही”, फडणवीसांचं जशास तसं उत्तर
रोहित पवारांनी पाणी पळवण्याचा प्रयत्न केला होता, यावर बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, जेव्हा उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं. त्यावेळेस जयंत पाटील पाटबंधारे मंत्री होते. त्यांच्या पाठीमागे लागून रोहित पवार आणि नगर जिल्ह्यातील बाकीचे आमचे यांनी मिळून हे पाणी खाली नेण्याचा प्रयत्न केला. मूळ योजना डिंबे धरणावरून वाहून जाणारं पाणी डोंगराला छेद करून शेजारच्या धरणांमध्ये न्यायची, अशी होती. परंतु बोगदा तळामध्ये घ्यायचा ठरला, त्याची साईझ देखील मोठी होती. यामुळे संपूर्ण डिंबे धरण तिन महिन्यांत खाली झालं असतं, त्याचबरोबर तिन्ही नद्यांवरील 65 बंधारे जे आता डिंबे धरणातून भरले जातात. त्यावेळी या बंधाऱ्यांना फक्त पावसाळ्यात पाणी देण्याची चर्चा सुरू होती. तसं झालं असतं, तर हे तालुके पुन्हा दुष्काळी झाले असते. म्हणून माझा विरोध होता. यापार्श्वभूमीवर अनेक बैठका झाल्या होता. परंतु यातून मार्ग निघाला नाही.
पवारांवर टीका होताच, अजितदादांनी सदाभाऊंना फोन करून झाप झाप झापलं…
जेव्हा सरकार बनलं, तेव्हा बंधाऱ्यांच्या पाण्याचा विषय आणि डिंबे धरणाचा विषय हे दोन्ही विषय घेवून मला वेगळी भूमिका घ्यावी लागली. गेले तीस-पस्तीष वर्ष मेहनत करून अशी परिस्थिती निर्माण केली, तेव्हा असं काही सहन होवू शकत नाही. त्यामुळे ही भूमिका घेतली होती, कोणतीही राजकीय नाराजी नव्हती. यावेळी अजित पवार यांनी पाठिंबा दिला होता. परंतु बाकीची मंडळी सहमत नव्हती, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत. पाणी पळवण्याचं षडयंत्र आम्ही जनतेला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत, असं वळसे पाटील म्हणाले आहेत.