Yashomati Thakur : तिवसा मतदारसंघासाठी काँग्रेसच्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी दाखल करताना हरियाणातील काँग्रेस आमदार विनेश फोगटही (Vinesh Phogat) उपस्थित होत्या. आपण कोणत्याही भ्रमात न राहता यशोमती ठाकूर यांचा बुलंद आवाज विधानसभेत पाठवा, असं आवाहन विनेश फोगट यांनी केलं.
आमदार आशुतोष काळे उद्या भरणार अर्ज; सुनिल तटकरे अन् सयाजी शिंदेंची असणार उपस्थिती
सुरुवातीला यशोमती ठाकूर यांनी नामांकन रॅली काढून मोठी सभा घेतली. मोठं शक्तीप्रदर्शन करत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यशोमती ठाकूर बाईक रॅली काढून आपल्या कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जातांना पाहायला मिळाल्या. या बाइक रॅलीमध्ये यशोमती ठाकूर स्वत: सहभागी होत कार्यकर्त्यांसोबत गाडी चालवतांना दिसल्या. त्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला.
सावनेरमध्ये केदारच लढणार, यादी जाहीर होण्याआधीच अनुजा केदारांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज…
यावेळी बळवंत वानखडे, खासदार अमर काळे, खासदार संजय देशमुख, वीरेंद्र जगताप दिलीप एडतकर यांच्या उपस्थितीत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला.
दरम्यान, ठाकूर यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत बोलताना विनेश फोगट म्हणाल्या की, केवळ महिलांवरच नव्हे तर तरुणांवरही अन्याय करणाऱ्या भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारचा पराभव करा आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार निवडून द्या. समाजाला आणि पर्यायाने महाराष्ट्राला यशोमती ठाकूर यांच्यासारख्या उंच आणि कणखर नेत्याची गरज आहे, विरोधक त्यांचा पराभव करण्याचे षडयंत्र रचतील, मात्र आपण कोणत्याही भ्रमात न राहता यशोमती ठाकूर यांचा बुलंद आवाज विधानसभेत पाठवा, असं आवाहन विनेश यांनी केलं.
संविधानाची ताकद दाखवा… – ठाकूर
तर तुमचे प्रेम, आशीर्वाद, विश्वास हीच माझी ताकद आहे. कोणत्याही अडचणीचा सामना करण्यासाठी तुमची साथ पुरेशी आहे. हा लढा केवळ निवडणुकीसाठी नसून संविधान वाचवण्यासाठी आहे. विद्यमान सरकारने तुमची फसवणूक केली आहे. शेतीमालाच्या किमती आजही पंधरा वर्षांपूर्वी होत्या त्याच आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने खोट्या योजना आणून मतदारांना भुलवले आहे. आम्हाला कोणत्याही प्रलोभनाला बळी पडायचे नाही. पक्ष आणि घर फोडण्याचे काम करणाऱ्यांना येणाऱ्या काळात संविधानाची ताकद दाखवून द्या, सजग राहून महाविकास आघाडीला भक्कम पाठिंबा द्या, असे आवाहन यशोमती ठाकूर यांनी केले.