Download App

भूमिकेसाठी तुला या लोकांबरोबर झोपावं लागेल, सईने सांगितला कास्टिंगचा धक्कादायक अनुभव

सिनेमामध्ये काम हवं असेल तर तडजोड करावी लागंल असं त्यांना म्हटलं जातं. यावर अभिनेत्री सई ताम्हणकरला तीच्या अनुभवावर बोलली आहे.

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Actress Sai Tamhankar : अभिनेत्रींना चित्रपटसृष्टीत अनेक कास्टिंग काऊचचे वेगवेळे अनुभव येतात. (Marathi Movie) सिनेमामध्ये काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल असं त्यांना म्हटलं जातं. यावर अनेक अभिनेत्री बोललेल्या आहेत. यामध्ये खासकरून नवख्या अभिनेत्रींना करिअरच्या सुरुवातीला काम मिळवायचं असेल तर अशा ऑफर दिल्या जातात. (Sai Tamhankar ) आतापर्यंत बऱ्याच अभिनेत्रींनी कास्टिंग काऊचमधील धक्कादायक अनुभव शेअर केले आहेत. ( Sexual Harassment) हिंदीसह मराठीमध्ये आपल्या अभिनयाने कामाचा ठसा उमटवणारी सई ताम्हणकरला याबद्दल अनुभव आला आहे.

 १५-२० वर्षांत पहिल्यांदाच घडल प्रतीक्षा संपली गूगल आईचा रहस्यमय टिझर प्रदर्शित, या तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

गेली अनेक वर्षे सई ताम्हणकर सिनेसृष्टीत सक्रिय आहे. तिने फक्त मराठीच नाही तर अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. मराठी व हिंदी प्रेक्षकांची चाहती सईला कास्टिंग काउचसंदर्भात एक फोन आला होता, तो प्रसंग तिनेच सांगितला आहे. ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत सईला कास्टिंग काऊचबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा तिने तिच्याबरोबर घडलेला प्रकार सांगितला. सई म्हणाली, “खूप आधी मला एक फोन आला होता. अशी अशी भूमिका आहे, पण तुला या लोकांबरोबर झोपावं लागेल. मी त्याला म्हटलं की हा मेसेज तू तुझ्या आईला फॉरवर्ड कर. तुझ्या बाबालाही पाठव. मला पुन्हा कधीच फोन किंवा मेसेज करू नकोस. १५-२० वर्षांत पहिल्यांदा आणि एकदाच असं घडलं होतं असं सई म्हणाली.

सईने सांगितला अनुभव अभिनेत्री रसिका सुनीलचा डॅशिंग लूक डंका हरीनामाचा  या चित्रपटातही झळकणार

या मुलाखतीत सईने तिच्या घटस्फोटापासून ते मासिक पाळीसंदर्भात विचारण्यात आलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. सईला एकदा बसने प्रवास करताना वाईट अनुभव आला होता. त्या प्रसंगावरही ती बोलली आहे. सई सांगलीहून मुंबईला येत होती. त्यावेळी बसमध्ये तिच्या पाठीमागे बसलेल्या एका मुलाने तिच्या दंडाजवळ पकडलं होतं. यामुळे घाबरलेल्या सईने त्याचा हात पकडून पिरगाळला होता आणि त्याला दम दिला होता. याबद्दलही ती यामध्ये विस्ताराने बोलली आहे. असे अनुभव त्रासदायक असतात असंही ती म्हणाली. दरम्यान, सईच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती भूमी पेडणेकरच्या ‘भक्षक’ चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकली होती. लवकरच ती ‘मटका किंग’ सीरिजमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात विजय वर्मा मुख्य भूमिकेत आहे.

follow us

वेब स्टोरीज