Sharad Pawar News : लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, जे निवडणूक लढवतील त्यांच स्वागत असल्याचं म्हणत खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या निवडणूक लढवण्याचा ग्रीन सिग्नल दिला आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सर्वच पक्षांकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. या मतदारसंघात सुनेत्रा पवार यांनाच विजयी करण्याबाबतचे बॅनरही लागले आहेत. त्यावर बोलताना शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
भाजप आमदाराच्या गोळीबार प्रकरणाचे अहमदनगर कनेक्शन : फरार रणजीत यादवला अटक
शरद पवार म्हणाले, देशात लोकशाही असून प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, जे लोकं निवडणूक लढवतील त्यांचं स्वागत आहे. या शब्दांत शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांचं निवडणूक लढवण्यासाठी स्वागतच केलं आहे. मागील काही दिवसांपासून बारामीत लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. या मतदारसंघात सुप्रिया सुळे विद्यमान खासदार आहेत. राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता बारामती लोकसभा निवडणूकीत सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उतरणार असल्याचं बोललं जात होतं. बारामती मतदारसंघातील कार्यकर्त्यांकडूनही सुनेत्रा पवार यांनाच उमेदवारी देण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे. अशातच ही शाईफेकीची घटना घडल्याने एकच चर्चा सुरु झाली.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वीरधवल जगदाळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. या मागणीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद आणि भावजय अशी लढत होणार का? अशा चर्चांना ऊत आला होता. वीरधवल जगदाळे अजित पवार यांच्या जवळचे मानले जातात. त्यांनीच सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळण्याच्या मागणीचं पत्र सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे दिलं आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी एका अर्थाने सुनेत्रा पवार यांचं स्वागतच केलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे या विद्यमान खासदार आहेत. अशातच सुनेत्रा पवार यांच्याही नावाची चर्चा सुरु झाली असल्याने निवडणूकीत अजित पवार गटाने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्यास नणंद विरुद्ध भावजय अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे.
यावेळी बोलताना शरद पवार यांनी राज्यातील इतरही विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. पुण्यात काल ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि ज्येष्ठ कायदेतज्ञ डॉ. असीम सरोदे यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. सत्ताधाऱ्यांकडून सरोदे आणि वागळे यांच्यावर दहशत माजवण्याचा कार्यक्रम सुरु असून वागळे यांना सर्वसामान्य लोकांचा पाठिंबा आहे. हे म्हणजे झुंडशाही आणि सत्तेचा गैरवापरर असून राज्यकर्त्यांच्या आशिर्वादानेच या गोष्टी घडत असल्याची टीका शरद पवार यांनी यावेळी केली आहे.