Case Filed against Shirur former MLA Ashok Tekwade for fraud in loan amount : साधारणत: कर्जाचे हप्ते थकवल्यानंतर कर्जदाराला नोटीस येते. पण पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये संबंधित कर्जदाराला आपण न घेतलेल्या कर्जाची नोटीस आली. त्याने या प्रकरणी न्यायालयात दाद मागितल्यानंतर हे प्रकरण माजी आमदारापर्यंत पोहचल्याचा प्रकार घडला आहे हे प्रकरण नेमकं काय? पाहुयात…
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला या ठिकाणी सचिन बाळासाहेब गरुड या शेतकऱ्याची जमीन गहाण ठेवून कर्ज घेण्यात आले होते. याप्रकरणी माजी आमदार अशोक कोंडीबा टेकवडे यांच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
अहिल्यानगरकरांसाठी महत्त्वाची बातमी! नवरात्रीमध्ये ‘या’ पर्यायी मार्गाने करावी लागणार वाहतूक
गरुड यांनी 2019 मध्ये अजित मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सासवड आणि अजित नागरी सहकारी पतसंस्था सासवड या ठिकाणी कर्जासाठी अर्ज केला होता. यावेळी त्यांनी शेतजमीन गहाण ठेवून आवश्यक ती कागदपत्र देखील घेतली होती. यावर या संस्थांनी तब्बल 65 लाखाचं कर्ज मंजूर करून जमिनीवर बोजा टाकला.
मात्र हे कर्जदाराला न देता स्वतःच्याच खात्यात वळवून घेतलं. दुसरीकडे 2023 मध्ये गरुड यांना थेट कर्ज थकवल्याने जमिनीवर जप्ती आणणार असल्याची नोटीस आली. तेव्हा त्यांना धक्का बसला की, जे कर्ज आपल्याला मिळाले नाही. त्यासाठी आपली जमीन जप्त केली जाणार आहे.
भारतीयांचं अमेरिकेत उच्चशिक्षण अन् नोकरीचं स्वप्न भंगलं! H-1B व्हिसासाठी मोजावे लागणार 83 लाख
त्यामुळे त्यांनी याबाबत त्यांनी तहसील कार्यालयात चौकशी केली. तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी न्यायालयात दाद मागितली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी तपासाचा छडा लावला असता त्यामध्ये थेट माजी आमदार अशोक टेकवडे यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास अद्याप सुरू आहे.
कसा आहे आजचा दिवस? जाणून घ्या, मेष ते मीन बाराही राशीभविष्य…
यामध्ये माजी आमदार टेकवडे यांच्यासह दिलीप वाल्हेकर, बाळासाहेब काळे, अजिंक्य टेकवडे, विजया टेकवडे, दिनेश घोणे, भूषण गायकवाड, सतीश जाधव, प्रदीप जगताप, गणेश जगताप यांचा समावेश आहे.