Video : पुण्यात नव्या व्हायरसची एन्ट्री! 22 संशयित; जाणून घ्या, गुईलेन बॅरे सिंड्रोम नेमका काय?

पुण्यात एका नवीन व्हायरसचा शिरकाव झाला आहे. एचएमपीव्ही व्हायरसच्या धक्क्यातून सावरत असतानाच या विषाणूने नव्या संकाटाची चाहूल दिली आहे.

Letsupp Image (35)

Letsupp Image (35)

Pune News, Guillain Barre Syndrome : पुण्यात एका नवीन व्हायरसा शिरकाव झाला आहे. एचएमपीव्ही व्हायरसच्या धक्क्यातून सावरत असतानाच या विषाणूने नव्या संकाटाची चाहूल दिली आहे. इतकंच काय तर या विषाणूने पेरू देशात धुमाकूळ घातलाय त्यामुळे येथे हेल्थ इमर्जन्सी घोषित करण्यात आली आहे. आता याच विषाणूचे 22 संशयित रुग्ण पुण्यात आढळले आहेत. या रुग्णांना गुईलेन बॅरे सिंड्रोमची बाधा झाली असावी असा अंदाज आहे. या रुग्णांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तपासणी अहवाल आल्यानंतरच यावर भाष्य करता येईल. परंतु, या निमित्ताने एका नव्या व्हायरसचं नाव कानी आलं आहे. आता हा व्हायरस नेमका काय आहे? त्याची लक्षणं काय आहेत? आजाराचं स्वरुप काय आहे? हा विषाणू धोकादायक आहे का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया..

कोरोनाच्या लाटेत वाढला होता ‘हा’ घातक आजार; संशोधनातून धक्कादायक माहिती उघड

काय आहे गुइलेन बॅरे सिंड्रोम

जागितक आरोग्य संघटनेनुसार गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक न्युरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. यामध्ये शरीरातील रोगप्रतिकार शक्तीच मज्जातंतूवर हल्ला करू लागते. यामुळे स्नायू्ंमध्ये कमकुवतपणा येतो. स्नायू सुन्न पडतात त्यात वेदनाही होतात. या आजारात कधीकधी अर्धांगवायूचा झटका येण्याचीही शक्यता असते. या आजाराचा फैलाव वेगाने होत असला तरी रुग्ण लवकर बरे देखील होतात. परंतु, रुग्णांना बरे होण्यासाठी लागणारा वेळ मात्र वेगवेगळा असू शकतो.

आजाराची लक्षणे काय, कशी ओळखाल

गुईलेन बॅरे सिंड्रोम नसांवर परिणाम करणारा आजार. यात स्नायू कमकुवत होतात.

स्नायू कमकुवत झाल्याने वेदना होतात, संवेदना कमी होतात.

चेहरा, डोळे, छाती शरीरातील स्नायूंवर परिणाम होतो. तात्पुरता अर्धांगवायू तसेच श्वसनासही त्रास होतो.

हाताची बोटं, पायात वेदना होतात. चालताना त्रास, चिडचिडही होते.

या आजाराला ओळखण्यासाठी

आजार कुणाला होऊ शकतो ?

हा आजार कुणालाही होऊ शकतो. शक्यतो 12 ते 30 वयोगटातील लोकांमध्ये याचे प्रमाण जास्त दिसून येते. काही वेळा वयस्कर व्यक्तींनाही लागण होते. हा आजार धोकादायक नाही त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर अँड स्ट्रोकनुसार हा एक दुर्मिळ आजार आहे. अमेरिकेत दरवर्षी एक लाख लोकांमध्ये एकाला या विषाणुची लागण होते.

या आजाराला ओळखणे कठीण आहे. यासाठी माहिती असलेली परीक्षण पद्धती नाही. अशा वेळी मांसपेशीत कमकुवतपणा, तांत्रिक संवेदना आणि संवेदी परिवर्तनाच्या तपासणीसाठी अनेक परिक्षणांची मदत घेतली जाते. संशय वाटल्यास डॉक्टर स्पायनल फ्लुइडच्या नमुन्यांची तपासणी करतात. यामध्ये फक्त प्रोटीनच्या पातळीची तपासणी होते. कारण जीबीएसच्या रुग्णांत प्रोटीनची पातळी उच्च असते.

आरोग्य अधिकारी काय म्हणतात ?

12 ते 30 च्या दरम्यानच्या वयोगटातल्या लोकांना हा आजार होतो. हा आजार धोकादायक नाही आणि घाबरून जाण्याचे कारण नाही. या आजारासंदर्भात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. पुण्यात जे संशयित रुग्ण सापडले आहेत त्या रुग्णांची संपूर्ण माहिती घेण्यात आली आहे. या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या या आजारासंदर्भात घाबरून जाण्याचा कारण नाही. हा संसर्गजन्य आजार नाही. यासाठी वेगळी ट्रीटमेंट घ्यावी लागत नाही. नेहमीची जी ट्रीटमेंट असते तीच ट्रीटमेंट दिली जाते. तसेच लवकरात लवकर बरा होणारा हा आजार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. निना बोराडे यांनी दिली.

आजार नेमका कसा होतो?

गुलियन बॅरे सिंड्रोम आजार कसा होतो याची माहिती अजून समोर आलेली नाही. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी संशोधन सुरू आहे. मात्र यातील निम्म्या रुग्णांत व्हायरल किंवा अन्य संक्रमणांचा इतिहास दिसला आहे. ज्या लोकांची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत आहे त्यांना या आजाराचा जास्त धोका आहे.

Exit mobile version