Download App

माझेही शरद पवारांवर तेवढेच प्रेम पण काही राजकीय प्रश्न…; दिलीप वळसेंची जाहीर कबुली !

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

Dilip Walse Patil On Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) हे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना मानसपूत्र मानतात. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) फुटीत ते अजित पवार यांच्यासोबत गेलेले आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या मनावर ती खोल जखम झाली आहे. दोन दिवसांपूर्वी वळसे यांच्या मतदारसंघात बोलताना शरद पवार यांनी बोलून दाखविले. विधानसभा, मंत्री, विधानसभा अध्यक्षपद व साखर कारखान्याचे राष्ट्रीय अध्यक्षपद दिले. पण त्यांनी पाच टक्केही निष्ठा पाळली नाही, असे दुःख शरद पवारांनी बोलून दाखविले. त्याच बरोबर त्यांना धडा शिकविण्याची वेळ आल्याचा इशाराही पवारांनी दिला आहे. त्यानंतर दोन दिवसात एका कार्यक्रमात दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांवर माझेही तेवढेच प्रेम आहे. पण काही राजकीय प्रश्न असतात, असे वळसे म्हणाले.

CM एकनाथ शिंदेबाबत धमकीची पोस्ट, मुंबई पोलिसांनी तरुणाला पुण्यातून केली अटक


शिरुर तालुक्यातील पाबळ येथील श्री क्षेत्रपाल भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. यासाठी मंत्री दिलीप वळसे पाटील हेही उपस्थित होते. उपस्थितांना ते मार्गदर्शन करत होते. पाबळचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे वळसे सांगत होते. त्याचवेळी त्यांच्यासमोर काही जणांनी शरद पवार जिंदाबादच्या घोषणा दिल्या. त्यावेळी आयोजकांनी घोषणा देणाऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भाषण करत असलेल्या वळसे यांनी घोषणा देणाऱ्यांना उद्देशून भाषण केले.

Ajay Barskar : ज्याची संपत्ती 300 कोटी तो 40 लाख का घेईल? बारस्करांचा जरांगेंना थेट सवाल

वळसे म्हणाले, अरे बाबांनो, मी तुम्हाला सांगतो. तुमचे जेवढे प्रेम पवारांसाहेबांवर आहे. तेवढेच प्रेम माझे त्यांच्यावर आहे. मी चाळीस वर्षे त्यांच्यासोबत राहिले आहे. पण काही राजकीय प्रश्न असतात. ते राजकीय सभेत बोलू असे सांगून वळसे यांनी आपले भाषण संपविले आहे.

follow us

वेब स्टोरीज