Kalyani Nagar Car Accident Pub Managers Police Custody : कल्याणी नगर भागात (Kalyani Nagar Car Accident) घडलेल्या भीषण अपघात प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने अल्पवयीन मुलांना दारू सर्व्ह केल्याप्रकरणी कोझी अन् ब्लॅक पब सील करण्यात आले आहेत. त्यात आता कोझी आणि ब्लॅक या पबच्या व्यवस्थापकांच्या ( Pub Managers ) अडचणीत आणखी वाढ झाली आहे. व्यवस्थापकांना विशेष न्यायालयाने 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
भाजपसाठी जुळून आली समीकरणे… पालघरमध्ये डॉ. हेमंत सावरांना विजयाची संधी
यामध्ये कोझी हॉटेलचे मालक नमन भुतडा आणि बारचे व्यवस्थापक काटकर तर ब्लॅक पबचे मॅनेजर संदीप सांगळे यांचा समावेश आहे. तर पोलिसांनी न्यायालयामध्ये ब्लॅक क्लबमध्ये दारू पुरवली जात असल्याचं सादर केलं आहे. तसेच तेथील वाईन सर्विंग झोन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांशिवाय आहे. त्यात कल्याणी नगरमध्ये भरधाव गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन तरुणाला प्रवेश कसा दिला गेला? यासर्वांची चौकशी करण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयात केली आहे.
Pune Car Accident Case: Three arrested accused have been sent to police custody till 24th May by the special court in Pune. #Maharashtra
— ANI (@ANI) May 21, 2024
पुणे पोलिसांच्या ‘पाच’ चुका… ‘पोर्श अपघात अन् दोन निष्पापांचा बळी’ प्रकरण शेकलं!
या प्रकरणामध्ये नागरिकांनी दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेवर कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी युक्तिवाद केला आहे. त्यांनी सांगितले की, या घटनेमुळे पायी चालणाऱ्या तसेच इतर प्रवाशांच्या मनात भीतीचं वातावरण आहे. तसेच या प्रकरणी दोन एफआयआर व्हायला नको होते. असे देखील सरोदे यांनी म्हटलं. तर बचाव पक्षाच्या वकिलांनी बालन्याय कायद्याअंतर्गत अदखलपात्र गुन्ह्यांसाठी दोन एफआयआर नोंदवल्याचे सांगितलं. न्यायालयाने दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर कोझी आणि ब्लॅक या पबच्या व्यवस्थापकांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान या भीषण अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह पाच जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईची सूत्र हातात घेतली आहे. कोझी आणि ब्लॅक पबवर कारवाईसाठी उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत. अधिकाऱ्यांकडून येथील दारूच्या (Alcohol) साठ्यासह अन्य साहित्य सील करण्यास सुरूवात करण्यात आली असून, अल्पवयीन मुलांना दारू सर्व्ह केल्याप्रकरणी कोझी अन् ब्लॅक पब सील करण्यातआले आहे.