Kalyani Nagar Car Accident : जामीनाचा निर्णय धक्कादायक; फडणवीस ‘अॅक्शन’ मोडमध्ये
पुणे : कल्याणी नगर परिसरात (Kalyani Nagar Car Accident) झालेल्या भीषण अपघात प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात बैठक घेत सुरू असलेल्या करावाईचा आढावा घेतला. यावेळी दोन जणांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन मुलाला जामीन देण्याचा कोर्टाचा निर्णय पोलिसांसाठीही धक्का होता असे सांगितले. घडलेली ही घटना गंभीर असून, आतापर्यंत काय घडले पुढची कारवाई काय याबाबत चर्चा झाल्याचे फडवीसांनी सांगितले. या घटनेत पोलिसांनी 304 कलम लावले असून, बाल न्याय मंडळाची भूमिका प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. बाल न्याय मंडळाने केलेली कारवाई आमच्यासाठी धक्कादायक असून, आम्ही सुधारित आदेशाची अपेक्षा करत आहोत. तसे न झाल्यास पोलील उच्च न्यायालयात दाद मागतील. (Devendra Fadnavis Press On Pune Kalyani Nagar Car Accident)
Pune Accident : वाढदिवसाला बाबांना सरप्राईज द्यायचं ‘ती’चं स्वप्नच अपूर्णच; आश्विनीच्या आईचा टाहो…
काय म्हणाले फडणवीस?
पत्रकार परिषदेला संबोधित करताना फडणवीस म्हणाले की, या घटनेमुळे लोकांमध्ये संताप आणि नाराजी पाहायला मिळाली यामुळे मी पोलीस आयुक्तांकडे घटनेची संपूर्ण माहिती घ्यायला आलो आहे. मी घटनेची सविस्तर माहिती घेतली असून, यात Ipc 304 लावण्यात आला आहे. हा मुलगा 17 वर्ष 8 महिन्याचा आहे निर्भयाकांडामुळे कायद्यात बदल करण्यात आलाय. 16 वर्षीय वरील मुलांना अडल्ट ट्रीट करता येत पोलिसांनी ते केलं होत पण तो अर्ज सीन अँड फाईंड म्हणून बाजूला ठेवला गेलाय खरतर पोलिसांसाठी पण हा धक्का होता.
Pune Car Accident Case | Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis says, "The incident that happened in Pune where two youths died is disturbing. I took a meeting with the police officials and took stock of what has happened till now and what action will be taken…" pic.twitter.com/STggOCC3z3
— ANI (@ANI) May 21, 2024
पोलिसांनी सर्व पुरावे दिले आहेत. कोणत्या हॉटेलात गेला काय केलं, वयाचे पुरावे दिले, गाडीचे पुरावे दिले. एवढेच नव्हे तर, सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि दुरुस्ती दिल्यानंतर ज्युवेनाईल बोर्डाने आश्चर्यकारक भूमिका घेतली. त्यामुळे वरच्या कोर्टात अर्ज केला आहे. कदाचित आज त्यावरची ऑर्डर अपेक्षित आहे. येथे योग्य निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा आहे. वरच्या कोर्टाचा दृष्टीकोण पाहता ज्युवेनाईल जस्टिस बोर्ड ऑर्डर देतील. तसे न झाल्यास पोलीस वरच्या कोर्टात जातील. या प्रकरणात जिथपर्यंत जावं लागेल तिथपर्यंत जाण्याची पोलिसांची इच्छा असून, ज्यांनी अंडरएजला दारू दिली त्या चौघांनाही अटक करण्यात आली आहे.
#WATCH | Pune Car Accident Case | Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis says, "The incident that happened in Pune in which two people died after a car which was driven by a minor hit them. There was a huge public outrage in Pune. When the minor was presented before the Juvenile… pic.twitter.com/6XY57WQXGN
— ANI (@ANI) May 21, 2024
या प्रकरणातून अनेक बाबी समोर आल्या असून, लोकवस्तीतील पब, ओळखपत्र तपासणी, cctv कॅमेरा मॉनिटरिंग करणं याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच नाकाबंदी करून ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई केली जाणार आहे. ड्रायव्हिंग लायसन्स तपासणीचे आदेश पोलीसांना देण्यात आले आहेत.