Download App

“अरे मामा जरा जपून, तुला सरळ करायला वेळ लागणार नाही”; दत्तामामा भरणेंना शरद पवारांचा दम

अरे मामा जरा जपून. काय बोलता, कुणासाठी बोलता? हे लक्षात ठेवा. सरळ करायला वेळ लागणार नाही अशा शब्दांत शरद पवार यांनी नामोल्लेख टाळत थेट इशारा दिला.

Image Credit: letsupp

Sharad Pawar Speech in Indapur : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. आजच बारामती (Baramati Lok Sabha) मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे आज शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी सभांचा धडाका लावला आहे. आज दुपारी शरद पवार यांची (Sharad Pawar) इंदापुरात सभा झाली. या सभेत त्यांनी विरोधकांना थेट इशारा दिला. यावेळी त्यांच्या निशाण्यावर होते आमदार दत्ता मामा भरणे. शरद पवारांनी आज थेट इंदापुरात येत आमदार भरणेंना ललकारलं. अरे मामा जरा जपून. काय बोलता, कुणासाठी बोलता? हे लक्षात ठेवा. सरळ करायला वेळ लागणार नाही अशा शब्दांत शरद पवार यांनी नामोल्लेख टाळत थेट इशारा दिला.

Loksabha Election : शरद पवारांनी चारवेळा शिवसेना फोडली, दीपक केसरकरांचा हल्लाबोल

भाषणात शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. शरद पवार म्हणाले, आम्ही विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली. यानंतर देशातील परिस्थिती बदलू लागली आहे. केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेशसह अनेक राज्यात भाजपाची सत्ता नाही. काही राज्यांत भाजपाची सत्ता आहे. या पार्श्वभुमीवर आताच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे देशाचा कारभार चांगल्या पद्धतीने करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीचा पराभव केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही असे शरद पवार म्हणाले.

लोकांना दमदाटी करून आपल्याला पाहिजे त्या रस्त्याने नेण्याचा काही जणांचा प्रयत्न आहे. राज्यात मी अनेक ठिकाणी फिरत आहे. त्यात एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवत आहे ती म्हणजे आता राज्यातल्या जनतेला बदल हवा आहे. हा बदल म्हणजे भाजपला पराभूत करणे असे शरद पवार म्हणाले.

विरोधकांवर टीका करण्याऐवजी मोदींनी देशात काय केलं? शरद पवार परभणीत कडाडले

दत्तात्रय भरणेंना रोखठोक इशारा

यानंतर शरद पवारांनी आमदार दत्ता भरणेंचा चांगलाच समाचार घेतला. इंदापुरात काही जण आम्हाला मदत करण्यासाठी तयार आहेत. पण या लोकांना तुमच्या शेतातील पाणी बंद करू म्हणून धमक्या दिल्या जात आहेत. शेतीसाठीचं पाणी कुणाच्या बापाची इस्टेट नाही. मी त्यांना एवढच सांगतो की मामा जरा जपून. सरळ करायला वेळ लागणार नाही. तुझ्यासाठी काय मदत केली नाही. दुकानासाठी मदत केली. मात्र आज त्यांचे पाय जमिनीवर राहिलेले नाहीत.

पण आता इतकंच सांगतो कुणी जर सत्तेचा गैरवापर करून दमदाटी करण्याचं काम करत असतील तर त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम मी एक ते दोन दिवसांत करू शकतो. मात्र मला त्या वाटेनं जायचं नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी रोखठोक इशारा दिला.

follow us

वेब स्टोरीज