Download App

हडपसर सर्वात मोठा मतदारसंघ, पुण्यात वाढला टक्का कुणाला देणार धक्का?

पुण्यात काल सायंकाळी सहा वाजेपर्यंत ५०.५० टक्के, शिरुर लोकसभेसाठी ४७.५० टक्के तर मावळ लोकसभेसाठी सुमारे ५२.३० टक्के मतदान झाले.

Lok Sabha Election : राज्यात काल चौथ्या टप्प्यातील मतदान झालं. यामध्ये पुणे, शिरुरसह अकरा लोकसभा मतदारसंघांचा समावेश होता. देशातील मतदानाचा विचार केला तर यंदा पुण्यातील मतदानाचा टक्का घसरला होता. पण, मागील निवडणुकीच्या तुलनेत पुण्यातील मतदानात दोन टक्क्यांची वाढ दिसून आली. आता हेच वाढलेलं मतदान कुणाला धक्का देणार आणि कुणाला तारणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. पुण्यात काल सायंकाळी सहा वाजेपर्यंत ५०.५० टक्के, शिरुर लोकसभेसाठी ४७.५० टक्के तर मावळ लोकसभेसाठी सुमारे ५२.३० टक्के मतदान झाले. मागील निवडणुकीच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा टक्का वाढला आहे. मात्र शिरुर आणि मावळमध्ये मतदानाचा टक्का कमी झाला आहे.

पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरुर आणि पुणे या मतदारसंघातील लढती चुरशीच्या होणार हे आधीच दिसत होतं. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या स्टार प्रचारकांनी येथे हजेरी लावली. रोड शो अन् जंगी सभा घेतल्या. या सभांना लाखोंची गर्दी जमली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे स्टार प्रचारक आले होते. आता त्यांच्या सभांचा किती इफेक्ट झाला, मतदारांनी कुणाला कौल दिला याचं उत्तर ४ जूनलाच मिळणार आहे.

शिरूर अन् पुणे मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला, नंदुरबारमध्ये सर्वाधिक मतदान

पु्ण्यात महायुतीचे मुरलीधर मोहोळ यांना टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीने आमदार रवींद्र धंगेकर यांना तिकीट दिलं. तर वसंत मोरे यांना वंचित आघाडीने उमेदवारी दिली. महिन्याभरापासून मतदारसंघात प्रचाराचा धडाका सुरू होता. शिरुर मतदारसंघात माजी खासदार आढळराव पाटील यांनी जनसंपर्क कायरम करत विकासकामांचा दावा केला. मावळमध्ये श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे यांनीही विकासाच्या मुद्द्यावर मते मागितली.

मागील लोकसभा निवडणुकीत पुण्यात ४९.८७ टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का वाढला आहे. शिरुरमध्ये ५९.४४ टक्के आणि मावळमध्ये ५९.५७ टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत यंदा शिरुरमध्ये ४७.५० टक्के तर मावळमध्ये ५२.३० टक्के इतके मतदान झाले आहे. या दोन्ही मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत घट झाली आहे.

आचारसंहिता भंग प्रकरणी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेल्हे शाखेवर गुन्हा दाखल

शिरुर लोकसभा मतदारसंघात हडपसर आणि भोसरी हे मोठे विधानसभा मतदारसंघ आहेत. हडपसरमध्ये ५.८१ लाख मतदार आहेत. यापैकी ३८ टक्के म्हणजेच २ लाख ५१ हजार मतदारांनी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान केले होते. भोसरीत ५.५१ लाख मतदार आहेत त्यापैकी २ लाख ३२ हजार मतदारांनी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान केले होते.

मतदानाची टक्केवारी

पुणे
२०१९ – ४९.८७ टक्के
२०२४ – ५०.५० टक्के

शिरुर
२०१९ – ५९.४४ टक्के
२०२४ – ५१.४६ टक्के

मावळ
२०१९ – ५९.५७ टक्के
२०२४ – ५२.३० टक्के

follow us