आचारसंहिता भंग प्रकरणी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेल्हे शाखेवर गुन्हा दाखल

आचारसंहिता भंग प्रकरणी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेल्हे शाखेवर गुन्हा दाखल

Pune PDCC Bank : पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या लोकसभेच्या निवडणुका चालू असून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (PDCC Bank) काल रात्री उशिरापर्यंत ही बँक चालू होती. त्या दरम्यान भरारी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. (Lok Sabha Election) नियमांच्या पुढे उशिरापर्यंत बँक चालू ठेवल्याने आचारसंहिता भंग केल्याचा ठपका बँक व्यवस्थापकावर ठेवण्यात आला आहे.

 

रोहित पवारांनी केले आरोप

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक काल रात्री उघडी ठेवण्यात आल्याची माहिती आणि त्याबद्दलचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी समोर आणला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारीतकर करत त्यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. आज पुणे, बारामती माढा या लोकसभा मतदारसंघात मतदान झालं. त्या पार्श्वभूमीवर या बँकवर शंका उपस्थित केली जात आहे. तसंच, पैशांचा वापर झाल्याचा थेट आरोपही काही ठिकाणी केला जात आहे.

 

आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा

या घटनेतील सीसीटीव्ही निवडणूक भरारी पथकाने तपासले आहेत. त्यामध्ये सुमारे 40 ते 50 लोक संशयितरीत्या फिरत असल्याचं दिसत आहे. या घटनेची दखल घेत बँक मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच, आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडियो सोशल मीडियावर शेअर करत त्यावर प्रश्न उपस्थित केले. त्यानुसार भरारी पथकाने माहिती घेऊन आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube