IAS Pooja Khedkar : परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या (Pooja Khedkar) अडचणी सातत्याने वाढत चालल्या आहे. युपीएससीने गुन्हा (UPSC) दाखल केला आहे तसेच अनेक चौकशांचा ससेमिराही सुरू आहे. यातच आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. पूजा खेडकरला अपंगत्व प्रमाणपत्र दिल्या प्रकरणी चौकशी सुरू आहे. पुणे जिल्हाधिकारी (Pune) कार्यालयाने वायसीएम रुग्णालयाच्या डॉक्टरांसह पूजाला मदत करणाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आता या सगळ्यांची चौकशी होणार असून या चौकशीत काही तथ्य आढळल्यास कारवाई होण्याचीही शक्यता आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने तशा सूचना पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार पिंपरी चिंचवड पालिकेच्या वैद्यकिय विभागाला याबाबत आदेश मिळाल्याची माहिती आहे.
तुरुंगातही मनोरमा खेडकरचा तोरा कायम; चॉकलेट्स अन् बऱ्याच गोष्टींची पोलिसांकडं मागणी
वायसीएम रुग्णालयाने पूजा खेडकरला अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले आहे. यात पूजा खेडकर डाव्या गुडघ्यात सात टक्के अधू असल्याचे म्हटले आहे. या प्रमाणपत्राच्या आधारावर पूजाने केंद्रीय दिव्यांग विभागाकडून अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवल्याचे समोर आले होते. त्यामुळे आताच्या चौकशीला आणखी महत्व प्राप्त झाले आहे. या चौकशीतून काय बाहेर येते याकडे लक्ष लागले आहे.
रुग्णालयाने दिलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे पूजा खेडकर शासकीय सेवेत रुजू झाल्या आहेत का अशी शंका दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने उपस्थित केली आहे. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी गरजेची आहे. या चौकशीत जर दोषी आढळले तर प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरसह पूजा खेडकरला मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा असे आदेश आयुक्तालयाने दिले आहेत. या चौकशीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात आता आणखी काय बाहेर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
IAS पूजा खेडकर नॉट रिचेबल? पोलिसांकडून शोध सुरु; मसुरीत हजर होण्याचा अंतिम दिवस
दरम्यान, पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात छळाची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात खेडकर यांचा जबाब नोंदविण्यासाठी पोलिसांनी त्यांना दोनवेळा समन्स बजावले होते. मात्र त्या हजर राहिल्या नव्हता. या दरम्यान, केंद्रीय लोकसेवा आयोगानेही खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नाव बदलून परीक्षा देणे, आयोगाची फसवणूक करणे अशा आरोपांवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय तुमची निवडच का रद्द करु नये, याबाबत उत्तर देण्यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.