Download App

मावळमध्ये निकालाआधीच महायुतीत फटाके; बारणेंचा राष्ट्रवादीवर मोठा आरोप

लोकसभा निकालापूर्वीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने माझा 100 टक्के प्रचार केला नाही अशी खदखद बारणे यांनी व्यक्त केली आहे.

Shrirang Barane : देशभरात लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. यामध्ये सात टप्पे होणार असून नुकताच पाचवा चप्पा पार पडला. पाचवा टप्पा हा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा होता. देशात आणखी दोन टप्पे बाकी आहेत. दरम्यान, दोन टप्पे बाकी असताना आणि निकाल दूर असातानाच मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादीवर खापर फोडायला सुरूवात केली आहे.

 

शिरूर, मावळमध्ये झाली घट, पुण्यात मतदानाचा टक्का वाढला

डिपॉझिट जप्त झालं असतं

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने माझा 100 टक्के प्रचार केला नाही अशी खदखद बारणे यांनी व्यक्त केली आहे. तसंच, जर त्यांनी माझा प्रचार केला असता तर शिवसेना (उबाठा) गटाचे लोकसभा उमेदवार संजोग वाघेरे यांचं डिपॉझिट जप्त झालं असतं अस म्हणत तहीही मी 2 लाख 50 हजार 374 मतांनी विजय होई असा दावाही बारणे यांनी केला आहे. परंतु, आपण जी लोक आपला प्रचार करत नव्हती त्यांची नाव अजित पवारांना सांगितली आहे असंही ते म्हणाले आहेत.

 

लीड तोडू शकणार नाहीत

मावळ लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात पनवेल आणि पिंपरी चिंचवड शहर ही दोन मोठी महानगरं आहेत. याठिकाणी महायुतीला मानणारा मोठा वर्ग आहे. याठिकाणी उबाठा गटाची ताकद नाही. चिंचवड विधानसभा मतदारसंघात पडलेल्या 3 लाख 22 हजार मतांपैकी मला दोन लाख मतं पडतील. पनवेल विधानसभा मतदारसंघात 1 लाख 80 हजार मतदान पडले. या दोन मतदारसंघांमध्ये मिळालेला लीड समोरचा उमेदवार तोडू शकणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

 

राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर बारणेंचा संताप; म्हणाले, संजय राऊत यांना..

काय म्हणाले उमेश पाटील

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आपला प्रचार केला नाही असा आरोप श्रीरंग बारणे यांनी केला. त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी 100 टक्के महायुतीचं काम केलं आहे. उन्नीस-बिस मागे-पुढे होऊ शकत त्यावर असं बोलण योग्य नाही असंही ते म्हणाले आहेत.

follow us