राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर बारणेंचा संताप; म्हणाले, संजय राऊत यांना..

राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर बारणेंचा संताप; म्हणाले, संजय राऊत यांना..

Shrirang Barne Criticized Sanjay Raut : शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यासंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) ऑन कॅमेरा थुंकले. या प्रकाराने राज्यातील राजकारण ढवळून निघाले असून राऊत यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

खासदार बारणे यांनी आज पिंपरी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, राऊत यांनी जे विधान केले ते अतिशय लज्जास्पद आहे. डॉ. श्रीकांत शिंदे हे २०१४ पासून खासदार आहेत. त्यांच्याविषयी बोलत असताना त्यांचे नाव घेतल्यावर थुंकणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही. मात्र, खासदार संजय राऊत यांना ‘ग’ ची बाधा झाली आहे. त्यांना गर्व झाला आहे.

राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार? शरद पवारांच्या शिलेदारासाठी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची फिल्डिंग

एखाद्या नेत्याने द्वेषापोटी किती खालच्या पातळीवर जावे याला मर्यादा आहे. त्यांना गर्व झालेला आहे. श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांचा कायमच आदर केला आहे. केवळ नाव घेतल्यावर थुंकणे हे राऊत यांना शोभत नाही. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो.

राऊतांचे पोस्टर फाडले, जोडे मारले

संजय राऊत यांनी केलेल्या कृत्यावर शिवसेनेकडून (शिंदे गट) पुण्यात आज फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक चौकात ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. तसेच त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

‘त्यांच्या बोलण्यानं आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत’; अजितदादांचा राऊतांवर पलटवार

अजित पवार- राऊत यांच्यात जुंपली 

दरम्यान, संजय राऊत यांच्या वक्तव्यावर अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली. बोलताना प्रत्येकाने भान ठेऊन बोलावे. तारतम्य बाळगावं असे पवार म्हणाले होते. त्यावर राऊत यांनी संतप्त होत धरणात मुतण्यापेक्षा थुंकलेलं चांगलं असे म्हटले. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा होत असतानाच अजित पवार यांनी पुन्हा प्रतिक्रिया दिली. ती मोठी माणसं आहेत. त्यांच्या बोलण्यानं आमच्या अंगाला भोकं पडत नाही. आम्ही त्यांचा आदरच करतो असा टोला पवार यांनी लगावला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube