Sinhagad Fort closed for Tourist due to Cracks and trees fell : गेल्या आठवड्यामध्ये पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाने हाहःकार माजवला होता. त्यामुळे धरण साठ्यात वाढ झाल्याने अचानक पाणीदेखील सोडण्यात आले होते. त्यामुळे पुणे शहरात परिस्थिती निर्माण झाली होती. या दरम्यान अनेक पर्यटन स्थळांवर खबरदारी म्हणून पर्यटकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यातच आता पर्यटकांचं पुण्यातील खास आकर्षण असणारा सिंहगड किल्ला (Sinhagad Fort) देखील पर्यटकांसाठी बंद (closed for Tourist) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मराठा आरक्षण! सर्वच खासदारांनी मोदींना भेटून तोडगा काढावा; उद्धव ठाकरेंनी ठासून सांगितलं
डोंगराचा मोठा भाग त्याचबरोबर काही झाडं कोसळल्याने सिंहगड किल्ल्यावर जाणारा रस्ता सध्या बंद झाला आहे. सध्या वनविभागाकडून ही दरड हटवण्याचे काम सुरू आहे. मात्र यासाठी काही दिवस लागणार असल्याने पर्यटकांना पुढील काही दिवस किल्ल्यावर जाता येणार नाही. अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आले आहे.
Hiba Nawab: हिबा नवाबचा खास अभिनय; स्टार प्लसच्या “ये तीज बड़ी है मस्त मस्त” मध्ये ती जादू करणार
दुसरीकडे गेल्या आठवड्यात झालेल्या भीषण पावसाने विविध पर्यटन स्थळं ही धोक्याची बनले आहेत. अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, त्याचबरोबर धबधब्यांमध्ये लोक वाहून गेल्याच्या दुर्घटना देखील घडत आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यातच पुण्यातील अनेक पर्यटन स्थळांवर जाण्यास पर्यटकांना मनाई करण्यात आली होती. त्यात आता सिंहगड किल्ला देखील पर्यटकांसाठी काही दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील तसेच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होणार आहे.