मराठा आरक्षण! सर्वच खासदारांनी मोदींना भेटून तोडगा काढावा; उद्धव ठाकरेंनी ठासून सांगितलं
मराठा आरक्षण प्रश्नी सर्वच खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून तोडगा काढावा, अशी भूमिका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडलीयं. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

Udhav Thackeray On Maratha Reservation : राज्यात मागील काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ओबीसी आणि मराठा समाजात संघर्ष सुरु असल्याचं दिसून येत आहे. एकीकडे मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झालायं तर दुसरीकडे ओबीसी नेतेही मागे राहिल्याचं दिसून आलं नाही. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांनी थेट मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर अनेक चर्चांना उधाण आलं. अखेर मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीयं. आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा वाढवण्याचा अधिकार राज्याला नसून लोकसभेला आहे, त्यामुळे सर्वच खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून मोदींनीच यावर तोडगा काढावा, अशी भूमिका ठाकरे यांनी मांडलीयं. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
वेशांतर करून अजितदादांची शहांसोबत भेट; सुळेंच्या मागणीने एअरपोर्ट अधिकारी गोत्यात येणार?
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलकांनी भेट घेतली. सत्ताधारी सरकारने काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, पण राज्य सरकारने राजकारण्यांना बोलवण्यापेक्षा सर्वच समाजातील नेत्यांना बोलावून यावर तोडगा काढला पाहिजे, मात्र एकमेकांमध्ये भांडणे लावून सत्ताधारी राजकीय पोळी भाजत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलायं.
धक्कादायक! ‘पतीने इंजेक्शन देऊन साखळदंडाने बांधलं’, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात सापडली महिला
तसेच भांडण लावून राज्याची विल्हेवाट लावणाऱ्यांचं स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका. आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा अधिकारी राज्याला नाही, त्यामुळे लोकसभेतच हा प्रश्न सुटू शकतो. ठाकरे गटाचे सर्वच खासदारांचं समर्थन मिळेल. राज्यातील सर्व खासदारांनी पंतप्रधांनांकडे जावं. आरक्षणाबाबतचा निर्णय मोदी देतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. ओबीसी मराठा आरक्षणावर मोदींनीच भूमिका स्पष्ट करावी. लोकसभेत मोदींनी निर्णय घ्यावा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे,
शरद पवारांसोबत पार्टनरशीप करुन देतो : ऑफर ऐकताच कॉन्स्टेबलने सगळं विकलं अन् 93 लाखांची फसवणूक
पंतप्रधान मोदींना दैवी शक्ती प्राप्त
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दैवी शक्ती प्राप्त झालेली आहे. राज्यात मराठा-ओबीसी समाजाचा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वाद सुरु झाला आहे. मोदी नेहमीच त्यांच्या संघर्षाबाबत भाषणामध्ये सांगत असतात. त्यामुळे राज्यात आपापसांत भांडणे करण्यापेक्षा मोदींकडेच हा प्रश्न मांडून त्यावर तोडगा काढावा, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.