Hiba Nawab: हिबा नवाबचा खास अभिनय; स्टार प्लसच्या “ये तीज बड़ी है मस्त मस्त” मध्ये ती जादू करणार

Hiba Nawab: हिबा नवाबचा खास अभिनय; स्टार प्लसच्या “ये तीज बड़ी है मस्त मस्त” मध्ये ती जादू करणार

Ye Teej Badi Hai Mast Mast : स्टार प्लसने तीजच्या खास मुहूर्तावर प्रेक्षकांसाठी “ये तीज बडी है मस्त मस्त” हा शो आणला आहे. यावेळी प्रेक्षकांना त्यांचे आवडते कलाकार आणि जोडपे बॉलीवूड गाण्यांवर नृत्य करताना आणि खास स्किट्स आणि अभिनय करताना पाहायला मिळणार आहेत. “झनक” या शोमध्ये झनकची भूमिका साकारणाऱ्या हिबा नवाबचा या शोमध्ये खास परफॉर्मन्स असणार आहे. पिवळा लेहेंगा परिधान करून ती स्टेजवर “घूमर” आणि “ये रिश्ता क्या कहलाता है” सारख्या गाण्यांवर नृत्य करताना दिसणार आहे.

‘ओडेला 2’ मध्ये तमन्ना भाटिया 800 कलाकारांसह क्लायमॅक्स करणार शूट, कुठ होणार शूटिंग?

अनिरुद्धची भूमिका साकारणाऱ्या तिच्या सहकलाकार कृशाल आहुजासोबत ती “तुझे में रब दिखता है” गाण्यावर परफॉर्म करणार आहे. ही अभिनेत्री आपल्या अभिनयाने कायम प्रेक्षकांना आश्चर्यचकित करत आली आहे. या अभिनेत्रीची कलाकारी अदा पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

स्टार प्लस शोची हिबा नवाब उर्फ ​​झनकने म्हणते, आम्ही तीजच्या निमित्ताने प्रेक्षकांसाठी काहीतरी खास घेऊन येत आहोत, स्टार प्लसवर ‘ये तीज बडी है मस्त मस्त’ हा शो येत आहे. मी ‘घूमर’ आणि ‘ ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ हा अभिनयासोबतच माझा पॅशन राहिला आहे आणि मला वाटतं की मी आता येत असलेल्या या कार्यक्रमात नक्कीच चांगलं काम करू शकेल.

ॲक्शन फिल्म अल्फा ची शूटिंग झाली सुरू अभिनेत्री शर्वरी वाघ आलिया भट्टसोबत पडद्यावर झळकणार

वयाच्या ७ व्या वर्षी हिबाने रोजा ठेवला होता. त्यावेली ती चांगलीच चर्चेत आली होती. त्या काळात मला खूप आनंद मिळाला असं हिबा म्हणाली होती. हा एक मोठा उत्सव आहे. मला नमाज कसा करायचा हे देखील माहित नव्हतं, म्हणून माझी आई आणि काकू मला शिकवत असायच्या असंही तिने त्यावेळी सांगितलं होतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube