Video : अंजनेरी किल्ल्यावर अडकलेल्या पर्यटकांची कशी सुटका झाली ?
tourists trapped at Anjaneri Fort rescued: Rain update: Video : अंजनेरी किल्ल्यावर अडकलेल्या पर्यटकांची कशी सुटका झाली ?
राज्यात पावसाळी पर्यटन जोरात सुरू आहे. मुसळधार पावसामुळे (Rain) नद्या, नाल्यांना पूर आला आहे. त्यातून अनेक जण वाहून गेल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. तर गड-किल्ल्यांवर भ्रमंतीला गेलेले पर्यटक ही अडकल्याच्या घटना घडत आहे. नाशिकमधील (Nashik) अंजनेरी किल्ल्यावर (Anjaneri Fort) दोनशेहून अधिक पर्यटक हे रविवारी अडकून पडले होते. जोरदार पाऊस सुरू होता. त्यात पाण्याच्या लोंढ्यात हे पर्यटक अडकून पडले होते. शेवटी वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवत या पर्यटकांना सुखरूपपणे बाहेर काढले. सुमारे सहा तासांच्या अथक परिश्रमानुसार पर्यटकांची सुटका झाली आहे.
Laxman Hake : … म्हणून शरद पवार भुजबळांची भेट, लक्ष्मण हाकेंचा मोठा खुलासा
नाशिकच्या वनसंरक्षक अधिकारी वृषाली गाडे यांनी याबाबत माहिती दिली. रविवारी या किल्ल्यावर पर्यटकांची तुफान गर्दी झाली होती. त्यात जोरदार पावसामुळे पायऱ्यांवर जोरदार पाणी वाहत होते. त्यात दोनशे ते तीनशे पर्यटक हे अडकून पडले होते. त्यानंतर सोमवारी बाहेर काढण्यात आल्याची माहिती गाडे यांनी दिली.
https://x.com/ANI/status/1812849813307978016?t=c0kz9adUmVOc9zphgHfR2A&s=08
अनेक जिल्ह्यात पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यानुसार मंगळवारी मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूरमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच कर्नाटक, केरळ, कोकण, गोवा येथे वीस सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
कोकण रेल्वे सुरुळीत
जोरदार पावसामुळे कोकणात रेल्वे मार्गावरील बोगद्यांमध्ये पाणी घुसले होते. तसेच दरडी कोसळल्या होत्या. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ही ठप्प झाली होती. त्यानंतर सोमवारी दुपारी रेल्वे सेवा सुरुळीत सुरू झाली आहे. गेल्या चोवीस तास हा मार्ग बंद होता.