Download App

चार वर्षांपूर्वी लग्न अन् आता युजवेंद्र चहल – धनश्री वर्माचा घटस्फोट, धनश्रीला मिळणार 60 कोटींची पोटगी ?

Yuzvendra Chahal And Dhanashree Verma Divorced :  गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असणाऱ्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आहे.

  • Written By: Last Updated:

Yuzvendra Chahal And Dhanashree Verma Divorced:  गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असणाऱ्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आहे. भारतीय स्टार खेळाडू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांचा घटस्फोट झाला आहे. माहितीनुसार, गुरुवार 20 फेब्रुवारी रोजी मुंबईतील (Mumbai) एका फॅमिली कोर्टात (Family Court) घटस्फोटाची प्रक्रिया करण्यात आली आहे.

गुरुवारी सकाळी 11 वाजता युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा घटस्फोटाच्या अंतिम सुनावणीसाठी वांद्रे येथील फॅमिली कोर्टात उपस्थित होते. या प्रकरणात सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांनी दोघांनाही काउन्सिलरकडे पाठवलं. दोघांचंही काउन्सिलरकडे हे सेशन 45 मिनिटं सुरू होतं मात्र त्यानंतर देखील दोघांमध्ये परिस्थिती सामान्य न झाल्याने अखेर न्यायालयानं दोघांच्याही घटस्फोटाला मान्यता दिली असल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, चहल आणि धनश्री गेल्या 18 महिन्यांपासून एकमेकांपासून वेगळे राहत होते आणि न्यायाधीशांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात धनश्री आणि युजवेंद्र दोघांनीही परस्पर संमतीनं घटस्फोट घेत असल्याचं म्हटलं आहे. कम्पॅटिबिलिटी संबंधित मुद्यांमुळे एकमेककांपासून विभक्त होत आहे अशी माहिती दोघांही फॅमिली कोर्टात दिली. यानंतर न्यायालयाकडून  घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

तर दुसरीकडे या घटस्फोटानंतर चहल धनश्री वर्माला तब्बल 60 कोटी रुपयांची पोटगी देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. धनश्री वर्मानं चहलकडे 60 कोटी रुपयांची पोटगी मागितली असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र घटस्फोटावेळी पोटगीची रक्कम किती ठरली? याबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

भारताची धमाकेदार सुरुवात, शामी, गिल चमकले, बांग्लादेशचा 6 विकेटने पराभव

चार वर्षांपूर्वी युजवेंद्र आणि धनश्री वर्मानं एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र गेल्या काहीदिवसांपासून दोघांमध्ये अनेक वाद होत असल्याचे बातम्या समोर आल्या होत्या आणि त्यानंतरच सोशल मीडियावर दोघांमध्ये घटस्फोट होणार असल्याची सुरु झाली होती.

follow us