Download App

PCB चा आयसीसीला इशारा, चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेल नाहीच; टीम इंडिया काय करणार?

पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी आयसीसीला स्पष्ट शब्दांत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हायब्रीड मॉडेलचा विचार करणार नसल्याचे सांगितले आहे.

Champions Trophy in Pakistan : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा (Champions Trophy in Pakistan) पुढील वर्षात पाकिस्तानात होणार आहेत. या स्पर्धांची तयारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) सुरू केली आहे. यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्याचा प्लॅन बोर्डाने आखला आहे. मात्र ही स्पर्धा सुरू होण्याआधीच वाद वाढू लागला आहे. पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी आयसीसीला स्पष्ट शब्दांत हायब्रीड मॉडेलचा विचार करणार नसल्याचे सांगितले आहे. हा सगळा वाद टीम इंडिया (Team India) पाकिस्तानाचा दौरा करण्यावरुन निर्माण झाला आहे. या प्रकरणात बीसीसीआयने (BCCI) अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु, मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात (Pakistan Cricket) जाणार नाही.

शुक्रवारी श्रीलंकेची राजधानी कोलंबो शहरात आयसीसीच्या अधिकाऱ्यांची एक बैठक होणार होती. रिपोर्ट्सनुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे की हायब्रीड मॉडेलवर विचार केला जाणार नाही. पाकिस्तानच या स्पर्धांचे आयोजन करणार आहे. यामध्ये कोणतेही हायब्रीड मॉडेल लागू केले जाणार नाही. भारतीय संघाला पाकिस्तानात घेऊन येण्याचं काम आयसीसीचं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं नाही, असेही मोहसीन नक्वी यांनी सांगितले.

Champions Trophy : पाकिस्तानला घाईच फार.. स्पर्धेचा ड्राफ्ट तयार, टीम इंडियासाठी ‘या’ शहराचा विचार

काही दिवसांपूर्वी आयसीसीने पीसीबीने पाठवलेल्या स्पर्धेच्या शेड्यूलला मंजुरी दिली होती. या शेड्यूलनुसार टीम इंडियाचे सर्व सामने लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये होणार आहेत. जर भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला तरीही हा सामना देखील लाहोरमध्येच होणार आहे. या शेड्यूलनुसार भारत पाकिस्तान यांच्यातील सामना 1 मार्च रोजी होणार आहे.

याआधी असे सांगितले जात होते की जर भारताने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला तर पाकिस्तान टीमही 2026 मधील टी 20 वर्ल्डकप खेळण्यास भारतात जाणार नाही. याआधी झालेल्या आशिया कप स्पर्धेतही असाच वाद निर्माण झाला होता. आशिया कप पाकिस्तानात होता. पण टीम इंडियाने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे भारताचे सामने श्रीलंकेत आयोजित करावे लागले होते. आता चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मात्र असे कोणतेच हायब्रीड मॉडेल आम्ही स्वीकारणार नसल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट सांगितले आहे.

Pakistan Team : टीम इंडियाच्या विश्वचषकाचा ‘हिरो’, पाकिस्तानचा हेड कोच; PCB ने केलं कन्फर्म

दरम्यान, या स्पर्धेसाठी पात्र ठरलेले आठ संघ पाकिस्तानला जाणार की नाही याबाबत अजून काहीच निर्णय झालेला नाही. परंतु, मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही असे स्पष्ट होत आहे. भारतीय संघाने तर मागील 17 वर्षांपासून एकदाही पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. त्यामुळे या स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार का याबाबतही काहीच निर्णय झालेला नाही. याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार भारत सरकारला आहे. या गोष्टी माहिती असतानाही पाकिस्तान बोर्डाने मात्र स्पर्धेच्या शेड्यूलचा ड्राफ्ट आयसीसीला पाठविले होते. या स्पर्धा पुढील वर्षात फेब्रुवारी महिन्यात सुरू होऊ शकतात.

follow us