World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेत आज भारत विरुद्ध इंग्लड सामना लखनौंमध्ये रंगला आहे. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत भारतीय संघाने इंग्लडला 230 धावांचं आव्हान दिलं आहे. या खेळीमध्ये कर्णधार रोहित शर्मा, सुर्याने शानदार खेळप्रदर्शन केलं आहे. रोहित शर्मांने शानदार खेळी करीत 101 धावांमध्ये 87 धावा पूर्ण केल्या आहेत.
सामन्यादरम्यान इंग्लड संघाने नाणेफेक जिंकूनही भारताला पहिल्यांदा फलंदाजी करण्यास निमंत्रित केलं होतं. त्यानंतर इंग्लडच्या गोलंदाजांनी कर्णधाराच्या निर्णयाला साथ देत भारतीय फलंदाजांसमोर भेदक गोलंदाजी केली. सामन्याला सुरुवात होताच इंग्लडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना हलक्या स्वरुपात तंबूत पाठवलं. यामध्ये शुभम गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर या आघाडीच्या फलंदाजांना दोन पटाची धावसंख्याही पार करता आलेली नाही.
‘मी फक्त हॉलिवूडचे कपडे घालतो’; गुणरत्न सदावर्तेंनी सांगितल्या पेहरावाबद्दलच्या गोष्टी
कोहलीला अवघ्या 9 बॉलमध्येही आपलं खातं उघडता आलं नाही. विश्वचषक सामन्यात विराट पहिल्यांदाच शून्य धावांवर बाद झाला आहे. तर शुभमनने 13 चेंडूत चौकार मारत 9 धावा केल्या आहेत. त्यासोबतच अय्यरने 16 बॉलचा सामना करुन 4 धावा खेचण्याच यश मिळवलं आहे. फलंदाजीची अवस्था पाहुन कर्णधार रोहित शर्मा याने संघाला सावरल्याचं पाहायला मिळालं आहे.
Sanjay Raut : फडणवीसांचा इतिहास कच्चा, मोदींच्या कृपेने.. ‘त्या’ आरोपांवर राऊतांचे उत्तर
आघाडीच्या फलंदाजांनी तंबू गाठल्यानंतर शर्मासह राहुलने डाव सावरल्याचं दिसून आलं. रोहित शर्मा आणि राहुलमध्ये 91 धावांचा भागीदारी केली. राहुलने सुरुवातीला चांगली फलंदाजी केली. पण पुढे त्याला ही खेळी जमली नाही. बॉल मारण्याच्या ओघात ते बाद झाला. राहुलने 58 बॉलमध्ये 39 धावांचं महत्वपूर्ण योगदान दिलं आहे.
शरद पौर्णिमेदिवशी चंद्राचे प्रतिबिंब दुधात पडण्याला इतके महत्त्व का? जाणून घ्या सविस्तर…
त्यानंतर कर्णधार शर्मावरच संघाची पूर्ण जबाबदारी होती. शर्माने 101 बॉलमध्ये 87 धावांचा टप्पा पार केला. शर्माच्या षटकार, चौकारामुळे भारतीय संघाला चांगलीच उमेद मिळाल्याचं दिसून आलं होतं. अखेर शर्माचीही बॅट अधिक काळ तळपल्याचं पाहायला मिळालं नाही. शर्मानंतर सुर्यकुमारने धावांचा टप्पा पार केला होता. यावेळी जडेजाकडून सुर्यकुमारला चांगलीच साथ मिळाली.
Israel Hamas War : …तर सगळं जग आंधळ होईल; UNGA त गैरहजेरी अन् प्रियंकांचा केंद्र सरकारवर निशाणा
जडेजाने 13 बॉलमध्ये फक्त 8 धावा केल्या आहेत. तर जडेजानंतर मोहम्मद शमीही एकाच धावावर बाद झाला. सूर्याने जसप्रीत बुमराहाला साथीला घेत डावाला आकार दिला. अखेरीस मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात सूर्या तंबूत परतला. सूर्यकुमार यादव याने 47 चेंडूत 49 धावांची महत्वाची खेळी केली. सूर्यकुमार यादव याने आपल्या खेळीत चार चौकार आणि एक षटकार लगावला.