Israel Hamas War : …तर सगळं जग आंधळ होईल; UNGA त गैरहजेरी अन् प्रियंकांचा केंद्र सरकारवर निशाणा

Israel Hamas War : …तर सगळं जग आंधळ होईल; UNGA त गैरहजेरी अन् प्रियंकांचा केंद्र सरकारवर निशाणा

Israel Hamas War : इस्त्रायल हमास यांच्यातील यु्द्ध (Israel Hamas War) अजूनही संपलेलं नाही. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राने जनरल असेब्लीच्या विशेष सत्र बोलावण्यात आले होते. मात्र त्याला भारत गैरहजर राहिला. त्यावरून प्रियंका गांधींनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. या सत्रामध्ये शुक्रवारी इस्त्रायलकडून गाझापट्टीवर होणारे प्रतिहल्ले तात्काळ थांबवण्याची मागणी करण्यात आली.

प्रियंका गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा…

केंद्र सरकारवर टीका करताना प्रियंका यांनी एक्स या सोशल मिडीया माध्यामावर पोस्ट केली आहे. त्या म्हणाल्या की, भारत संयुक्त राष्ट्राने जनरल असेब्लीच्या विशेष सत्रात गैरहजर राहिला हे धक्कादायक होतं. जेव्हा पॅलेस्टिनी नागरिक महिला आणि मुलांना मारलं जात आहे. अशा वेळी गप्प राहण चुकीचं आहे. आपला देश अहिंसेच्या आधावर उभा असं म्हणत त्यांनी महात्मा गांधींचं एक वाक्य या ट्विटमध्ये टाकलं आहे. त्यांनी लिहिलं की, डोळ्याच्या बदल्यात डोळा मागितला तर सगळं जग आंधळ होईल.

Chandrashekhar Bawankule : ‘युती तोडण्याचं कारस्थान केलं, त्याचंच हे फळ’; बावनकुळेंनी राऊतांना सुनावलं

काय आहे नेमकं प्रकरण?

जॉर्डनच्या वतीने संयुक्त राष्ट्राच्या जनरल असेब्लीच्या विशेष सत्रामध्ये शुक्रवारी इस्त्रायलकडून गाझापट्टीवर होणारे प्रतिहल्ले तात्काळ थांबवण्याची मागणी करण्यात आली. या प्रस्तावाला दोन तृतीयांश मत मिळाली आणि तो पारित करण्यात आला. त्याला बांग्लादेश, मालदीव, पाकिस्तान, रशिया आणि दक्षिण अफ्रिकेसह 40 देशानी पाठिंबा दिला.

‘पुन्हा’ यायचं असल्यास तो व्हिडीओ टाकून येतो का? शिंदेंच आमचे CM! फडणवीसांकडून चर्चांचे खंडन

दुसरीकडे या प्रस्तावाला 120 मतदान झालं ज्यामध्ये 14 मत या प्रस्तावाच्या विरोधात होती. तर 45 देशांची या सभेला हजेरी नव्हती त्यात भारत देखील होता. दरम्यान भारत या सभेला हजर नव्हता याचं कारण सांगण्यात येत आहे की, या प्रस्तामामध्ये हमासने इस्त्रायलवर केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा कोणताही उल्लेख नव्हता. तर ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, जपान, युक्रेन आणि इंग्लंड हे देश देखील भारताप्रमाणे या मतदानासाठी गैर हजर होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube