‘पुन्हा’ यायचं असल्यास तो व्हिडीओ टाकून येतो का? शिंदेंच आमचे CM! फडणवीसांकडून चर्चांचे खंडन

‘पुन्हा’ यायचं असल्यास तो व्हिडीओ टाकून येतो का? शिंदेंच आमचे CM! फडणवीसांकडून चर्चांचे खंडन

मुंबई : एकनाथ शिंदे हेच आमचे मुख्यमंत्री आहेत, मी त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांच्याच पाठिशी राहणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील, एकही दिवस कमी नाही, असं स्पष्ट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “मी पुन्हा येईन” च्या व्हिडीओवर उत्तर दिलं. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरही टीका केली. (DCM Devendra Fadnavis replied to the video of Me Punha Yein)

काल (27 ऑक्टोबर) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा “मी पुन्हा येईन”, अशा आशयाचा व्हिडिओ भाजपच्या अधिकृत ‘एक्स’ अकाऊंटवरुन ट्विट करण्यात आला. मात्र काही वेळातच हा व्हिडिओ डिलीटही करण्यात आला. या संपूर्ण प्रकारावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. फडणवीस मुख्यमंत्री म्हणून कमबॅक करणार असल्याच्या चर्चा समाजमाध्यम आणि वृत्तवाहिन्यामध्ये सुरु झाल्या. भाजपकडून स्पष्टीकरण देत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

भाजपच्या ‘वॉर रुम’मध्येच अंतर्गत वॉर! ‘मी पुन्हा येईन’ व्हिडीओमागे दोन नेत्यांमधील भांडणं?

याच चर्चांवर फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला, यावर ते म्हणाले, माझा पहिला तर प्रश्न असा आहे की, एखाद्याला ‘पुन्हा’ यायचे असेल तर तो व्हिडीओ टाकून येतो का? किती वेडेपणा आहे, काही तरी डोकं ठिकाणावर पाहिजे ना? मी पुन्हा एकदा सांगतो, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आमचे मुख्यमंत्री आहेत, मी त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांच्याच पाठिशी राहणार आहे. एकनाथ शिंदे आपला कार्यकाळ पूर्ण करतील. एकही दिवस कमी नसेल, एखादा व्हिडीओ पडला म्हणून विश्लेषणाची गरज नाही. आगामी निवडणुका त्यांच्याच नेतृत्वात होतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

शरद पवार आणि माझ्यात हाच फरक :

शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्या व्हिडीओवर प्रत्तुत्तर दिले. ते म्हणाले, “मी त्या व्हिडिओला गांभीर्याने घेत नाही. फडणवीस यांच्याकडे 110 आमदार आहेत. त्यांना नजरअंदाज करता येणार नाही. माझ्याकडे 110 आमदार असते तर मी सरकार बनविले असते, अशी खोचक टीका केली. यावर फडणवीस यांनी प्रतिउत्तर दिले.

Sanjay Raut : ‘फडणवीस पुन्हा येत असतील तर स्वागतच करू’; राऊतांचा खोचक टोला

फडणवीस म्हणाले,देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार साहेबांच्यात हाच फरक आहे. मी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आमचे मुख्यमंत्री आहेत, मी त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांच्याच पाठिशी राहणार आहे. मी पुन्हा सांगतो, एकनाथ शिंदे आपला कार्यकाळ पूर्ण करतील. एकही दिवस कमी नसेल. त्यांच्याच नेतृत्वात भाजप आगामी निवडणुका लढेल, असेही त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube