‘मी फक्त हॉलिवूडचे कपडे घालतो’; गुणरत्न सदावर्तेंनी सांगितल्या पेहरावाबद्दलच्या गोष्टी

‘मी फक्त हॉलिवूडचे कपडे घालतो’; गुणरत्न सदावर्तेंनी सांगितल्या पेहरावाबद्दलच्या गोष्टी

Gunratna Sadavarte : बॉलिवूडचे कपडे गुणरत्न सदावर्ते घालत नाही, मी फक्त हॉलिवूडचे कपडे घालत असल्याचं वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी स्पष्ट केलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चांगलेच चर्चेत आलेले सदावर्ते यांनी नूकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत सदावर्ते यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

Karnataka Politics : कर्नाटकात काँग्रेस सरकार पडणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं भाजपाच्या मनातलं

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, मी जगभरात जेव्हापासून कामाला सुरुवात केली तेव्हा जगभरात गेलो. जपान, दुबईतून मी बुटं, कपडे खरेदी करीत असतो. मला नेहमीच स्टिचिंग ड्रेस आवडतात. माझ्या ड्रेसेसची निवड जयश्री पाटील करीत असतात. आम्ही जे काही खरेदी करीत असतो, ते आमच्या कष्टाच्या पैशांमधून असतं, प्रत्येक ठिकाणी आम्ही क्रेडिट कार्ड स्वाईप करीत असल्याचं गुणरत्न सदावर्ते यांनी स्पष्ट केलं आहे.

तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कायम सुटाबुटात दिसले आहेत, त्यामुळे ‘एकूनर आदमी, दसनूर कपडा’ असा आईने बाळकडू दिलेला आहे. आईने मला निर्धस्तपणा दिलायं. आज जे कपडे मी घातलेत तेसुद्धा जॅपनीज मेड आहेत. गुणरत्न सदावर्ते बॉलिवूडचे कपडे घालत नाही, हॉलिवूडचे कपडे घालतो, माझ्या चष्म्याची फ्रेमसुद्धा जगातील असल्याचं सदावर्ते यांनी यावेळी सांगितलं आहे.

मराठा आरक्षण आंदोलकांची नजर चुकवत CM शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर; पोलिसांनी पाळली कमालीची गुप्तता

मी माझ्या आयुष्यात कामेच एवढी केलेली आहेत पहाटे चारपर्यंत कामे संपत नाहीत. त्यामुळे कष्ट करीत रहा लोकांचं तुम्हाला प्रेम लाड मिळतील शेवटी कष्टाच्या पैशांच चीज होतं. आम्ही कष्टाने जगणारी माणसं आहोत, वडिलांनी आणि सासऱ्यांनी जेव्हा मुंबईत पाठवलं होतं, तेव्हा एकही रुपया दिला नव्हता. सासरे आणि वडिल विद्रोही होते. तेव्हा व्हिटी स्टेशनवर पोलिसांनी हाकलू नये म्हणून प्लॅटफॉर्म तिकीट घेतलं, दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ करुन वकीलीला सुरुवात केली होती, कोणी कोणाला काही देत नसतं, असंही गुणरत्न सदावर्तेंनी स्पष्ट केलं आहे.

Video Viral: आदित्य रॉय कपूरसोबत अनन्या पांडेचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; कमेंट्सचा वर्षाव

अभिनेता शाहरुख खानच्या बंगल्याजवळ एक सिस्टर बंगलो म्हणून सेट आहे. त्या सेटवरील कलाकार, अभिनेत्यांसह जे लोकं कपडे पुरतवात तेच माझे क्लाईंट आहेत. त्यामुळं मी आणि जयश्री पाटील त्यांच्यात प्रविण्य झालो, असल्याचंही सदावर्ते यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच गुणरत्न सदावर्ते यांनी याविरोधात अनेक विधाने केली आहे. त्यामुळे मराठा आंदोलक सदावर्तेंच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. संतप्त मराठा आंदोलकांकडून गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी एक मराठा, लाख मराठा अशा घोषणाही दिल्याचं पाहायला मिळालं होतं. मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरात आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube