T20 World Cup 2026 : पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या टी20 विश्वचषक 2026 पूर्वी आयसीसीने मोठा निर्णय घेत बांगलादेशला या स्पर्धेतून बाहेर केले आहे. आयसीसीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आता या स्पर्धेत बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला जागा देण्यात आली आहे. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान देखील या स्पर्धेतून माघार घेणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर जोराने सुरु आहे. बांगलादेश या स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी 24 जानेवारी रोजी एका निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधानांच्या मंजुरीनंतरच ते 2026 साठी पाकिस्तान संघाच्या सहभागाची पुष्टी करणार आहे. त्यामुळे जर पाकिस्तान या स्पर्धेतून बाहेर झाला तर कोणत्या संघाला संधी मिळणार? याबाबत सध्या सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे.
कोणता संघ पात्र ठरेल?
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, जर पाकिस्तान 2026 च्या टी20 विश्वचषक स्पर्धेतून (T20 World Cup 2026) बाहेर पडला तर पाकिस्तानच्या जागी युगांडाला (Uganda) आयसीसीकडून संधी देण्यात येणार आहे. नुकतंच बांगलादेशने (Bangladesh) 2026 च्या विश्वचषकात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर आयसीसीने स्कॉटलंडला स्थान दिले. आता याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. बांगलादेशऐवजी स्कॉटलंडला गट C मध्ये स्थान देण्यात आले आहे.
पाकिस्तानने त्यांच्या निवेदनात काय म्हटले आहे?
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी (Mohsin Naqvi) यांनी 2026 च्या टी-20 विश्वचषकाबाबत सांगितले की, जर पाकिस्तान सरकारने विश्वचषकात न खेळण्याचा निर्णय घेतला तर आयसीसी 22 वा संघ मैदानात उतरवू शकते. हा निर्णय पाकिस्तान सरकारचा आहे. पाकिस्तानचा संघ विश्वचषकात खेळेल की नाही हे पाकिस्तानचे पंतप्रधान परदेशातून परतल्यावरच स्पष्ट होईल. सध्याच्या वेळापत्रकानुसार, पाकिस्तान 7 फेब्रुवारी रोजी नेदरलँड्सविरुद्ध विश्वचषकाची मोहीम सुरू करेल, तर 10 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानचा सामना अमेरिकेशी होईल.
अजितदादांच्या आमदाराची एकच पोस्ट, दोन्ही राष्ट्रवादीमध्ये भडका उडणार?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल. 2026 च्या विश्वचषकात पाकिस्तान आपले सर्व सामने श्रीलंकेच्या भूमीवर खेळेल. जर पाकिस्तान उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी झाला तर हे सामने श्रीलंकेत होतील, अन्यथा ते भारतात होतील.
