Ind Vs Aus : पहिल्याच सामन्यात भारताचा 5 गडी राखून दणदणीत विजय…

Ind Vs Aus : वन डेच्या पहिल्याचं सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये वनडेचा पहिला सामना आज मोहालीमध्ये खेळवला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 276 धावांचा डोंगर उभा केला होता. भारताचा कर्णधार राहुलने 58 धावांची नाबाद खेळी करीत विजय खेचून आणला आहे. Sunil Shelke : ‘…तेव्हा भाजपसोबत जाण्यास रोहित पवार तयार होते’; […]

Ind Vs Aus

Ind Vs Aus

Ind Vs Aus : वन डेच्या पहिल्याचं सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये वनडेचा पहिला सामना आज मोहालीमध्ये खेळवला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 276 धावांचा डोंगर उभा केला होता. भारताचा कर्णधार राहुलने 58 धावांची नाबाद खेळी करीत विजय खेचून आणला आहे.

Sunil Shelke : ‘…तेव्हा भाजपसोबत जाण्यास रोहित पवार तयार होते’; अजितदादा गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 50 षटकात सर्व 10 गडी गमावून 276 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरने 52, जोश इंग्लिसने 45 आणि स्टीव्ह स्मिथने 41 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमीने पाच विकेट घेतल्या.

Anil Parab : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्यांना… अनिल परबांचा नार्वेकरांवर हल्लाबोल

प्रत्युत्तरात ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल यांनी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी 142 धावा जोडल्या. ऋतुराजने ७१ धावांची तर शुभमन गिलने ७४ धावांची खेळी केली. तर, सूर्यकुमार यादव 50 धावा करून बाद झाला. कर्णधार केएल राहुलने 58 धावांची नाबाद खेळी खेळली. राहुलने 49 व्या षटकात शॉन अॅबॉटला षटकार ठोकून टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

Dhangar Reservation : चौंडीतील उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली, उपोषणास्थळीच ऑक्सिजन लावले…

दरम्यान, भारताने 1996 नंतर म्हणजेच 27 वर्षांनंतर पहिल्यांदाच मोहालीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमध्ये विजय मिळवला आहे. या मैदानावरील दोघांमधील हा सहावा सामना होता. यापैकी भारताने दोन आणि ऑस्ट्रेलियाने चार विजय मिळवले आहेत.

1996 नंतर आता भारतीय संघाने बाजी मारली आहे. या मैदानावर ऑस्ट्रेलियाने मागील चार एकदिवसीय सामने जिंकले होते. मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना 24 सप्टेंबर रोजी इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे.

भारतीय संघाने 42 सामन्यात 4864 पॉईंट्स अन् 116 रेटिंग पॉईंट्स मिळवत अव्वल स्थान गाठले. भारत, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील ही अव्वल स्थानाची रस्सीखेच भारताने अवघ्या 1 गुणाने सध्या तरी जिंकली आहे. पाकिस्तानचे 29 सामन्यात 3231 पॉईंट्स आणि 115 रेटिंग पॉईंट्स आहेत. ते सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

Exit mobile version