IND Vs ZIM 2024 : झिम्बाब्वे विरुद्ध सुरु असलेल्या पाच टी-20 सामन्यांच्या (IND Vs ZIM 2024) मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने झिम्बाब्वेचा 23 धावांनी पराभव केला आहे. या मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला होता मात्र दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने जोरदार पुनरागमन करत हा सामना 100 धावांनी जिंकला होता. तर आता तिसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी करत या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे.
तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत झिम्बाब्वेसमोर 183 धावांचा लक्ष्य ठेवला होता. मात्र या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरुवात खराब झाली. वॉशिंग्टन सुंदरने एकाच षटकात 2 बळी घेत झिम्बाब्वेला या सामन्यात बॅकफूटवर नेले. झिम्बाब्वेने 20 षटकांत 6 गडी गमावून 159 धावा केल्या. झिम्बाब्वेकडून डिऑन मायर्सने (नाबाद 65) अर्धशतक झळकावले. क्लाइव्ह मदंडेने 37 धावांची खेळी केली.
तर वेस्ली मधवेरेने 1, तदिवनाशे मारुमणीने 13, ब्रायन बेनेटने 4, कर्णधार सिकंदर रझाने 15 आणि जोनाथन कॅम्पबेलने 1 धावा केल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक 3 बळी घेतले. आवेश खानने 2 आणि खलील अहमदने 1 बळी घेतला.
तर दुसरीकडे प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने 20 षटकांत 4 गडी गमावून 182 धावा केल्या. भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली.
मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्स लोगोचे अनावरण, आदित्य ठाकरेंची उपस्थिती अन् मोठी घोषणा
यशस्वीने 27 चेंडूत 36 तर गिलने 46 चेंडूत 66 धावा केल्या. तर अभिषेक शर्माने 9 चेंडूत 10 आणि ऋतुराज गायकवाडने 28 चेंडूत 49 धावा केल्या. संजू सॅमसन 7 चेंडूत 12 धावा करून नाबाद राहिला तर रिंकू सिंग 1 धावावर नाबाद राहिला होता.