Download App

ऑस्ट्रोलियासमोर 241 धावांचे आव्हान; शमी, सिराज, बुमराहवर मदार

World cup 2023 : विश्वचषक स्पर्धेचा (IND vs AUS Final) अंतिम सामना भारतीय संघासाठी आतापर्यंत खूपच वाईट राहिला आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने (IND vs AUS) 50 षटकांत 240 धावांवर केल्या आहेत. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक 66 धावा केल्या. विराट कोहलीने 54 आणि रोहित शर्माने 47 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रोलियासमोर विजयासाठी 241 धावांचे आव्हान दिले आहे.

ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. याशिवाय जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांना प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियन गोलंदाज अचूक प्लान करून मैदानात उतरले होते. त्यांनी प्रत्येक फलंदाजासाठी वेगळे प्लान केला आला होता.

अंतिम सामन्यात भारतीय फलंदाजांची कामगिरी किती निराशाजनक होती, याचा अंदाज 11 ते 40 षटकांमध्ये केवळ दोनच चौकार मारण्यात आल्याने लावता येतो. विश्वचषकाच्या सामन्यात अशा प्रकारची फलंदाजीची चाहत्यांनी अपेक्षा केली नसेल.

World Cup 1987 : एक्स्ट्रा पास नाकारले अन् मराठी माणसाने वर्ल्डकपची स्पर्धाच भारतात आणली!

टीम इंडियाला चांगली सुरुवात करता आली नाही. भारताने 5 व्या षटकातच शुभमन गिलच्या (04) रूपाने पहिली विकेट गमावली. यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील भागीदारी अवघ्या 46 धावांपर्यंत (32 चेंडू) पोहोचली होती, तेव्हा 10व्या षटकात ग्लेन मॅक्सवेलने कर्णधार रोहित शर्माला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तुफानी शैलीत खेळणारा हिटमॅन 31 चेंडूंत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 47 धावा करून बाद झाला.

IND vs AUS Final : विश्वचषकाची फायनल, रोहित शर्माने केला एक खास विक्रम

रोहित शर्माच्या विकेटनंतर भारतीय संघ सावरू शकला नाही की 11व्या षटकात श्रेयस अय्यर 04 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर पॅव्हेलियनमध्ये परतला. अय्यरला पॅट कमिन्सने बाद केले. त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी चौथ्या विकेटसाठी 67 धावांची (109 चेंडू) भागीदारी केली. ही भागीदारी पॅट कमिन्सने विराट कोहलीला बाद करुन मोडली. कोहली 4 चौकारांच्या मदतीने 54 धावा करून बाद झाला. यानंतर सहाव्या क्रमांकावर आलेला रवींद्र जडेजा 36व्या षटकात वैयक्तिक 09 धावांवर हेझलवूडचा शिकार झाला.

फायनलमध्ये विराटने इतिहास रचला, अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला

यानंतर चांगल्या खेळीच्या दिशेने वाटचाल करणारा केएल राहुल 42 व्या षटकात 1 चौकाराच्या मदतीने 66 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. राहुलला मिचेल स्टार्कने बाद केले. त्यानंतर 44व्या षटकात मोहम्मद शमीला मिचेल स्टार्कने 06 धावांवर बाद केले, 45व्या षटकात अॅडम झाम्पा बुमराहला 01 धावांवर बाद केले, 48व्या षटकात हेझलवूडने 18 धावांवर सुर्याला बाद केले आणि 50व्या षटकात कुलदीप यादव 10 धावा करुन बाद झाला.

Tags

follow us