फायनलमध्ये विराटने इतिहास रचला, अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला

फायनलमध्ये विराटने इतिहास रचला, अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला

World Cup Final : आयसीसी विश्वचषकाचा अंतिम सामना (World Cup Final) भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात अहमदाबाद येथे सुरु आहे. या सामन्यात आतापर्यंत अनेक विक्रम झाले आहेत. या क्रमवारीत टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीच्या (Virat Kohali) नावावर आणखी एक कामगिरी जमा झाली आहे. विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यात 50 हून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो सामील झाला आहे.

विराट कोहली ही कामगिरी करणारा जगातील सातवा आणि भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. याआधी 1979 मध्ये इंग्लंडचा मायकेल ब्रेअरली, 1987 मध्ये ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड बून, 1992 मध्ये पाकिस्तानचा जावेद मियाँदाद, 1996 मध्ये श्रीलंकेचा अरविंद डी सिल्वा, 2015 मध्ये न्यूझीलंडचा ग्रँट इलियट, 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ या खेळाडूंनी उपांत्य आणि अंतिम सामन्यात 50 पेक्षा जास्त धावा केल्या. यावेळी 2023 च्या विश्वचषकात विराट कोहलीच्या बॅटमधून चांगली धावा आल्या आहेत.

IND vs AUS Final : विश्वचषकाची फायनल, रोहित शर्माने केला एक खास विक्रम

यंदाच्या विश्वचषकात किंग कोहलीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 49 शतकांचा विक्रम मोडला आणि एकदिवसीय सामन्यात 50 शतके झळकावणारा पहिला फलंदाज बनला.

विराटने आज या स्पर्धेतील सलग पाचवी 50+ धावांची खेळी केली आहे. वर्ल्ड कप फायनलमध्ये अर्धशतक झळकावणारा तो चौथा भारतीय ठरला. विरेंद्र सेहवाग (82 वि. ऑस्ट्रेलिया, 2003), गौतम गंभीर (97 वि. श्रीलंका, 2011) आणि महेंद्रसिंग धोनी (91* वि. श्रीलंका, 2011) यांनी ही कामगिरी केली होती.

कपिल देवचे व्हिजन, गांगुलचे अ‍ॅग्रेशन अन् धोनीचा संयम : कर्णधार म्हणजे काय रोहितने दाखवून दिले!

विराटने या वर्ल्ड कपमध्ये 750 हून अधिक धावा केल्या आहेत. एका वर्ल्ड कपच्या एका पर्वात 750 हून अधिक धावा करणारा विराट जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. आयसीसी स्पर्धांच्या फायनलमध्ये सर्वाधिक 322 धावांचा विक्रमही विराटने नावावर करताना कुमार संघकाराला (320) मागे टाकले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube