Download App

India vs Zimbabwe: पहिल्याच चेंडूवर तेरा धावा; यशस्वी जैस्वालचा नावावर ‘वर्ल्ड रेकॉर्ड’

या मालिकेत भारत 3-1 ने आघाडीवर असल्याने भारताने मालिका जिंकल्यात जमा आहे. त्यामुळे शेवटच्या सामन्यात भारतीय संघात दोन बदल करण्यात आले.

  • Written By: Last Updated:

India vs Zimbabwe T-20 Series : क्रिकेटमध्ये वेगवेगळे विक्रम नोंदविले जातात. कधी फलंदाज, तर कधी गोलंदाज असे विक्रम नोंदवित असतात. परंतु भारत विरुद्ध झिम्बाव्बे (Zimbabwe) टी-20 मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात एक अनोखा विक्रम झाला आहे. हा विक्रम भारताचा (India) सलामीवीर यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal)याने केला आहे. टी-20 आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूवर यशस्वी जैस्वालने तब्बल तेरा धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणाऱ्या जैस्वाल हा जगातील पहिला फलंदाज ठरलाय.(India vs Zimbabwe: Thirteen runs off the first ball, Yashasvi Jaiswal world record)


भुजबळांनी मुद्दा छेडला अन् भाषण संपताच मराठा आरक्षणासाठी बारामतीत जोरदार घोषणा

टी-20 सामन्याच्या मालिकेतील पाचव्या सामना खेळविला जात आहे. भारतीय संघ फलंदाजीला आला. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने डावाचा पहिलाच चेंडू टाकला. त्या चेंडूवर सलामीवीर यशस्वी जैस्वालने षटकार मारला. परंतु पंचाने हा चेंडू नो-बॉल असल्याचे सांगितले. तो नो बॉल असल्याने जैस्वालला फ्री हीट मिळाली. फ्री हीटचा चेंडूवर जैस्वालने षटकार ठोकला. त्यामुळे स्कोअर कार्डवर एकच चेंडू असताना तेरा धावा नोंदविला गेल्या. त्यामुळे हा एक मोठा विक्रम झाला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असा विक्रम नोंदविला गेला आहे. पण पाच चेंडूत 2 षटकार मारत 12 धावा करणाऱ्या यशस्वीला रझाने बाद केले.

सल्ले देऊन महाराष्ट्र पेटविण्याचे उद्योग चालविले जातायत; भुजबळांचा शरद पवारांवर गंभीर आरोप

या मालिकेत भारत 3-1 ने आघाडीवर असल्याने भारताने मालिका जिंकल्यात जमा आहे. त्यामुळे शेवटच्या सामन्यात भारतीय संघात दोन बदल करण्यात आले. मुकेश कुमार आणि रियान पराग यांना संधी मिळाली. तर ऋतुराज गायकवाडला विश्रांती देण्यात आली होती.

भारताचे झिम्बाब्वेसमोर 168 धावांचे लक्ष्य

प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने 6 बाद 167 धावांपर्यंत मजल मारत झिम्बाब्वेसमोर 168 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताची सुरुवात खराब झाली. यशस्वी जैस्वाल पहिल्याच षटकात तंबूत परतला. तर चौथ्या षटकात अभिषेक शर्मा बाद झाला. त्याने 11 चेंडूत 14 धावांची खेळी केली आहे. कर्णधार शुभमन गिलही 13 धावांवर बाद झाला. त्यानंतर संजू सॅमसन आणि रियान परागने चौथ्या गड्यासाठी 65 धावांची खेळी केली. सॅमसनने 45 चेंडूत 58 धावा केल्या. तर रियान परागने 22 धावांची खेळी केली. तर शिवम दुबेने 12 चेंडूत 26 धावा कुटत स्फोटक खेळी केली.

follow us