यशस्वीच्या तुफानी खेळीने भारताचा झिम्बाब्वेवर दहा विकेट्सने विजय, मालिकेवर कब्जा !

  • Written By: Published:
यशस्वीच्या तुफानी खेळीने भारताचा झिम्बाब्वेवर दहा विकेट्सने विजय, मालिकेवर कब्जा !

India vs Zimbabwe: यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि कर्णधार शुभमन गिलच्या (Shubman Gill) दमदार खेळीच्या जोरावर भारताने (India) चौथ्या टी-20 सामन्यात झिम्बाब्वेचा (Zimbabwe) दहा विकेटने पराभव केला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने 3-1 आघाडीत घेत मालिका जिंकली आहे. झिम्बाब्वेने भारतासमोर 153 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य भारताने 16 षटकांत गाठले. त्यात यशस्वीने तुफानी फलंदाजी करत 53 चेंडूत 93 धावा केल्या. तर गिलने 35 चेंडूत अर्धशतक झळकाविले आहे.

“करू अजून कष्ट अन् जिंकून दाखवू महाराष्ट्र”; PM मोदींना CM शिंदेंचा विधानसभा विजयाचा शब्द


भारतीय संघाचा कर्णधार शुभमनने नाणेफक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय भारतीय गोलंदाजाने योग्य ठरवत झिम्बाब्वेला सात विकेट्सच्या बदल्यात 152 धावांवर रोखले. प्रत्युत्तर भारतीय संघाचे सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिलने चांगली सुरुवात केली. यशस्वीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पाचवे अर्धशतक झळकविले. त्याने 52 चेंडूत 93 धावांची खेळी केली. त्यात 13 चौकार आणि दोन षटकार खेचले. कर्णधार शुभमन गिलनेही 39 चेंडूत 58 धावांची खेळी केली. त्यात सहा चौकार आणि दोन षटकार मारले.

Pooja Khedkar : “माझ्या मुलीला विनाकारण..”; पूजा खेडकरच्या वडिलांचा दावा नेमका काय?

झिम्बाब्वेचा एकही गोलंदाज खास काही करू शकला नाही. सर्व गोलंदाजांसमोर दोन्ही सलामीवीर सहज खेळत फटकेबाजी करत होते. झिम्बाब्वेच्या फराज अकरमची सर्वाधिक धुलाई झाली. त्याने चार षटकांत 41 धावा दिल्या. तर कर्णधार सिकंदर रजा याचीही धुलाई झाली. त्याने दोन षटकांत 24 धावा दिल्या.

झिम्बाब्वेच्या फलंदाजांचा फ्लॉप-शो

या सामन्यात झिब्बाब्वेची फलंदाज अपयशी ठरली. कर्णधार रिकंदर रजा वगळता इतर फलंदाज खास काही करू शकले नाहीत. सिकंदर रजाने 46 धावांची खेळी. तर तदिवानाशे मरुमणीने 32 धावांचे योगदान दिले. तर वेसली मधेवेरे 25 धावा केल्या. भारताकडून खलील अहमदने दोन विकेट घेतल्या. तर तुषार देशपांडे, वॉशिंगटन सुंदर, अभिषेक शर्मा आणि शिवम दुबेने प्रत्येकी एक विकेट घेतली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube