Download App

IPL 2024 : लिलावाआधी मोठी बातमी! ‘केकेआर’ने ‘या’ खेळाडूला दिली संघाची कमान

IPL 2024  : आयपीएल क्रिकेट स्पर्धांच्या पुढील हंगामासाठी (IPL 2024) लिलाव लवकरच होणार आहेत. यासाठी तयारी सुरू असतानाच कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघातून मोठी बातमी समोर आली आहे. फ्रँचायजीचे सीईओ वेंकी मैसूर संघाचे कर्णधार आणि उपकर्णधाराच्या नावांची घोषणा केली आहे. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) कप्तान आणि नितीश राणा उपकर्णधार असतील. वेंकी पुढे म्हणाले, दुखापतीमुळे मागील आयपीएलमध्ये श्रेयस अय्यरला खेळता आले नाही हे दु्र्दैवीच म्हणावे लागेल. पण, आता अय्यरने पुनरागमन केले असून तो संघाचे नेतृत्वही करेल याचा आम्हाला आनंद आहे.

या दुखापतीतून बरे होण्यासाठी अय्यरने मोठी मेहनत घेतली आहे. मागील आयपीएल सत्र सुरू होण्याआधीच श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला या स्पर्धांत सहभागी होता आले नाही. त्याचा गैरहजेरीत संघाची कमान नीतीश राणा याच्या हाती देण्यात आली होती.

आता अय्यर फिट झाला आहे. मागील हंगामात नीतीश राणाने कर्णधाराच्या रुपात शानदार कामगिरी केली. आता उपकर्णधार म्हणून तो संघासाठी त्याचे सर्वश्रेष्ठ योगदान देईल यात काहीच संशय नाही, असे वेंकी म्हणाले. यानंतर श्रेयस अय्यर म्हणाला, मागील हंगामात आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. ज्यात माझ्या गैरहजेरीचाही समावेश आहे. माझ्या गैरहजेरीत नीतीशने चांगली कामगिरी केली. मला या गोष्टीचा आनंद आहे की त्याला आता उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तो त्याची कामगिरी योग्य पार पाडील यात काहीच शंका नाही.

IPL मध्ये प्रथमच महिला क्रिकेटपटूंचा लिलाव करणार! कोण आहेत मल्लिका सागर?

आयपीएल 2024 साठी केकेआरने आंद्रे रसेल, अनुकूल रॉय, हर्षित राणा, जेसन रॉय, नीतीश राणा, गुरबाज, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, सुनील नरेन, सुयश शर्मा, वैभव अरोडा, वरुण चक्रवर्ती आणि व्यंकटेश अय्यर या खेळाडूंना कायम ठेवले आहे.

तसेच आर्य देसाई, डेव्हिड वीज, जॉन्सन चार्ल्स, कुलवंत खेजरोलिया, लिटन दास, लॉकी फर्ग्युसन, मनदीप सिंह, एन. जगदीशन, शाकिब, शार्दुल ठाकूर, टीम साऊदी आणि उमेश यादव या खेळाडूंना रिलीज केलं आहे.
IPL Auction : 1166 खेळाडू अन् 263 कोटींचा वर्षाव; जाणून घ्या, IPL लिलावाची ‘खास बात’

Tags

follow us