IPL मध्ये प्रथमच महिला क्रिकेटपटूंचा लिलाव करणार! कोण आहेत मल्लिका सागर?

IPL मध्ये प्रथमच महिला क्रिकेटपटूंचा लिलाव करणार! कोण आहेत मल्लिका सागर?

Mallika Sagar : IPL 2024 चा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. यावेळी प्रथमच भारताबाहेर लिलाव आयोजित करण्यात आला आहे. यंदाच्या लिलावात प्रथमच एक महिला लिलाव करताना दिसणार आहे. मल्लिका सागर(Mallika Sagar) यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच क्रिकेटपटूंचा लिलाव करणार आहेत. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत फक्त दोन पुरुषांनी लिलाव केला आहे, मात्र, पहिल्यांदाच एक महिला लिलावाची प्रक्रिया पार पाडणार आहे.

Vijay Wadettiwar : ‘ईव्हीएम’बद्दलचा लोकांच्या मनातला संभ्रम दूर करा; वडेट्टीवारांचं सरकारला खुलं आव्हान

यंदाच्या वर्षीच्या आयपीएलमध्ये खेळाडूंचा लिलाव करताना ह्यू अॅडम्स दिसणार नाहीत. स्पोर्ट्सस्टारच्या माहितीनुसार, IPL 2024 च्या लिलावासाठी त्यांची सेवा घेतली जाणार नाही. त्यांच्याजागी जागी मल्लिका सागर यांच्याशी संपर्क साधण्यात आला असून, 19 डिसेंबर रोजी दुबई येथे खेळाडूंसाठी बोली लावण्यात येणार असल्याचं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

‘तळपता सूर्य अन् घामानं थपथपलेलं शरीर’; मनोज वाजपेयीने उलगडला’जोरम’ चा आव्हानात्मक प्रवास

कोण आहेत मल्लिका सागर?
मल्लिका सागर मुंबईच्या रहिवासी असून, यापूर्वीही तिने हे काम केले आहे. त्याने महिला प्रीमियर लीग 2023 च्या पहिल्या सत्रात म्हणजेच WPL मध्ये सर्व खेळाडूंचा यशस्वी लिलाव केला होता. महिला प्रीमियर लीगमधील लिलावाची तिची वेगळी शैलीही लोकांना आवडली आहे. याशिवाय प्रो-कबड्डी लीग 2021 च्या लिलावात मल्लिका सागरने लिलावा केला होता.

मराठा आरक्षणाच्या आशा पुन्हा मावळल्या? राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष राजीनाम्याच्या तयारीत

मल्लिका सागरला यांना कामाचा चांगला अनुभव असून आता त्या आयपीएल 2024 च्या लिलावात खेळाडूंचाही लिलाव करणार आहेत. आयपीएलची सुरुवात 2008 मध्ये झाली आणि तेव्हापासून आयपीएल 2023 पर्यंत एकूण 16 सीझन झाले आणि या कालावधीत फक्त दोनदा लिलाव आयोजित केला. रिचर्ड मेडली हा आयपीएल इतिहासातील पहिला लिलावकर्ता होता. त्यांनी 2008 ते आयपीएल 2018 पर्यंत खेळाडूंचा लिलाव केला. त्यानंतर, ह्युजेस एडमीड्सने त्यांच्याजागी लिलावकर्त्याची जबाबदारी स्वीकारली आणि त्यांनीच 2023 पर्यंत खेळाडूंसाठी बोली लावली होती.

आयपीएल 2022 च्या लिलावाच्या पहिल्या दिवशी अॅडम्सची तब्येत बिघडल्यानंतर ते स्टेजवरच कोसळले होते. त्यानंतर काही काळ लिलाव थांबवण्यात आला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि चारू शर्मा यांनी लिलाव प्रक्रिया पुढे नेली होती. मात्र, त्याच लिलावाच्या दुसऱ्या दिवशी अॅडम्स पुन्हा लिलावात आले. आता IPL 2024 च्या लिलावात काय बदल होतात हे पाहायचे आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube