Paris Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympic 2024) सुरू होण्यासाठी आता फक्त 8 दिवस उरले आहे. 26 जुलैपासून सुरू होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतातर्फे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर आता भारताच्या 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी देखील ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा देत एक खास सल्लाही दिला आहे.
कपिल देव यांनी ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना (Indian athlete) या क्रीडा महाकुंभात मुक्तपणे खेळण्याचा सल्ला दिला आणि आशा व्यक्त केली की पॅरिसमध्ये देश दुहेरी अंकांची पदके जिंकेल. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 117 सदस्यीय तुकडी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे आणि यावेळी भारतीय संघ टोकियोमध्ये जिंकलेल्या सात पदकांपेक्षा जास्त पदक यावेळी जिंकेल अशी अशा व्यक्त केली आहे.
ट्रिनिटी गोल्फ चॅम्पियन्स लीग (TGCL) च्या दुसऱ्या सत्राच्या घोषणेच्या वेळी बोलताना कपिल देव म्हणाले की, “मी कोणत्याही खेळाडूसाठी काहीही सांगू शकत नाही, परंतु मी त्यांना शुभेच्छा देऊ शकतो आणि आशा करतो की आम्ही यावर्षी आणखी पदके जिंकू. प्रत्येकाला माझा सल्ला असा आहे की जा आणि मोकळेपणाने खेळा. आम्ही दुहेरी आकडी पदके जिंकू अशी अपेक्षा आहे.”
गोल्फची आवड असलेल्या कपिल देवने हा खेळ देशाची प्रगती करत राहील, असा आशावाद व्यक्त करत जेव्हा मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा मला वाटले नव्हते की ते इतक्या उंचीवर पोहोचेल. मला आशा आहे की एक दिवस गोल्फ देखील क्रिकेटची उंची गाठेल. असं कपिल देव म्हणाले.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक हुकल्यानंतर भारतीय गोल्फपटू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यात यशस्वी होतील, अशी आशा पीजीटीआयचे अध्यक्ष कपिल यांनी व्यक्त केली होती. ऑलिम्पिकच्या भारतीय गोल्फ संघात अदिती अशोक आणि दीक्षा डागर यांना महिला गटात तर शुभंकर शर्मा आणि गगनजीत भुल्लर यांना पुरुष गटात स्थान मिळाले आहे.
मनोरमा खेडकरांच्या अडचणीत होणार वाढ? ‘त्या’ प्रकरणात होणार सखोल चौकशी
2021 टोकियो ऑलिम्पिकच्या महिला गोल्फ स्पर्धेत अदिती चौथ्या स्थानावर राहिली आणि कांस्य पदक कमी फरकाने हुकले होती. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारत गोल्फमध्ये पदक जिंकणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.