Paris Olympic 2024 चे सामने ‘या’ चॅनेल अन् ओटीटीवर पाहता येणार लाईव्ह

Paris Olympic 2024 चे सामने ‘या’ चॅनेल अन् ओटीटीवर पाहता येणार लाईव्ह

Paris Olympic 2024 Live Matches on Channel and OTT : यावर्षी ऑलम्पिक स्पर्धा ( Olympic 2024 ) होणार आहे. यावर्षीची स्पर्धा ही पॅरिस ( Paris ) ऑलम्पिक असून ती 26 जुलै 2024 ते 11 ऑगस्ट 2024 या दरम्यान भरवण्यात येणार आहे. त्यामुळे हे सामने क्रीडा रसिकांना कुठे पाहता येणार? असा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे जाणून घेऊ पॅरिस ऑलम्पिकचे सामने कोणत्या चॅनेल अन् ओटीटीवर (Channel and OTT) लाईव्ह पाहता येणार आहेत.

धोतर परिधान केले म्हणून मॉलमध्ये प्रवेश नाकारला; बेंगळुरूतील धक्कादायक प्रकार

ऑलम्पिकचे सामने कुठे पाहता येणार?

पॅरिस ऑलम्पिक 2024 चे सामने भारतामध्ये स्पोर्ट्स 18 नेटवर्क या एसडी आणि एचडी दोन्ही चॅनेलवर थेट प्रक्षेपित केले जाणार आहेत. त्याचबरोबर दूरदर्शनच्या स्पोर्ट्स चॅनलवर देखील पाहता येऊ शकतात. तर जिओ सिनेमा या ॲप आणि वेबसाईटवर ऑलम्पिकचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला जिओ सिनेमाचा वेगळा प्लॅन घेण्याची गरज नसणार आहे. कारण ऑलम्पिकचे सामने जिओ सिनेमावर विनामूल्य स्ट्रीमिंग करण्यात येणार आहेत.

भुजबळ फिरता रंगमंच तर, पवार मोठे…; राऊतांच्या मनात नेमकी कोणती स्क्रिप्ट?

यंदा 113 भारतीय खेळाडू गाजवणार पॅरिस

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत 2020 ला भारतीय संघ सर्वात मोठा 124 खेळाडूंचा चमू घेऊन मैदानात उतरला होता. चार वर्षांपूर्वी भारतीय खेळाडूंनी एकाच ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक 7 पदकं जिंकली होती. (Paris Olympic) 2012 च्या लंडन ऑलिम्पिकनंतर ( 6) ही पदकांची सर्वाधिक आकडेवारी होती आणि यंदा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 113 भारतीय खेळाडू टोक्योचा पदकाचा विक्रम मोडतील, अशी आशा आहे. (Niraj Chopra) निरज चोप्रा, पी व्ही सिंधू (PV Sindhu) यांच्यासह अनेक खेळाडूंवर भारतीयांची नजर असणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube