Download App

Paris Olympics 2024 : मनू भाकरने केली कमाल, भारताला मिळणार ‘या’ इव्हेंटमध्ये पहिलं पदक

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympics 2024) ची आजपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतासाठी एक

  • Written By: Last Updated:

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympics 2024) ची आजपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार भारताची नेमबाज मनू भाकरने (Manu Bhaker) महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल इव्हेंटच्या अंतिम सामन्यात एंट्री केली आहे. त्यामुळे आता या 10 मीटर एअर पिस्तूल इव्हेंटमध्ये पदक मिळण्याची शक्यता वाढली आहे.

मनू भाकर या इव्हेंटच्या पात्रता फेरीत एकूण 580 गुणांसह तिसऱ्या स्थानावर होती. मनूने पहिल्या राऊंडमध्ये 97, दुसऱ्या राऊंडमध्ये 97, तिसऱ्या राऊंडमध्ये 98, चौथ्यामध्ये 96, पाचव्यामध्ये 96 आणि सहाव्या राऊंडमध्ये 96 गुण मिळवले.

तर आता उद्या 28 जुलै रोजी मनू भाकर महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल इव्हेंटमध्ये अंतिम सामना खेळणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरु होणार आहे.

मनू भाकर टोकियो ऑलिम्पिकमध्ये विशेष काही करू शकली नव्हती मात्र पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये जबरदस्त कामगिरी करत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल इव्हेंटच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये ती 10 मीटर एअर पिस्तूल, 25 मीटर पिस्तूल आणि 10 मीटर पिस्तूल मिश्र संघ या तीन स्पर्धांमध्ये सहभागी होत आहे.

रिदम सांगवान फ्लॉप

दुसरीकडे 10 मीटर एअर पिस्तूल इव्हेंटमध्ये रिदम सांगवानने देखील भाग घेतला होता मात्र रिदम सांगवानला या इव्हेंटमध्ये आपली छाप सोडता आली नाही. या इव्हेंटमध्ये ती 573 गुणांसह 15 व्या स्थानावर होती.

पैसे नाहीत, वित्त विभागाच विरोध, योजना गुंडळणार? लाडक्या बहि‍णींना अजितदादांचा ‘वादा’

तर सरबज्योत सिंग आणि अर्जुन सिंग चीमा पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम सामन्यात पोहोचू शकले नाहीत. सरबज्योतने एकूण 577 गुणांसह पात्रता फेरीत नववे तर अर्जुनने 574 गुणांसह 18 वा स्थान मिळवला.

follow us