Download App

नीरज चोप्रा उद्या उतरणार मैदानात, सेमी फायनलमध्ये जर्मनीशी भिडणार भारत, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या अकराव्या दिवशी भारतीय स्टार ऍथलेटिक्स खेळाडू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) मैदानात दिसणार आहे.

  • Written By: Last Updated:

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या (Paris Olympics 2024) अकराव्या दिवशी भारतीय स्टार ऍथलेटिक्स खेळाडू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) मैदानात दिसणार आहे. नीरज चोप्रा भालाफेक पात्रता फेरीत खेळताना दिसणार आहे.

याच बरोबर भारतीय पुरुष हॉकी संघ सेमी फायनलमध्ये जर्मनीशी भिडणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनवर भारतीय हॉकी संघाने मात केली होती. कुस्तीमध्ये विनेश फोगट महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाइल स्पर्धेच्या प्री-क्वार्टरमधून आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे तर महिलांच्या 400 मीटर स्पर्धेत, पहल किरण उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या आशेने रेपेचेज फेरीत उतरेल. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिक 204 चा अकरावा दिवस भारतासाठी महत्वाचा ठरणार आहे. चला मग जाणून घेऊया अकराव्या दिवसाचा संपूर्ण वेळापत्रक

6 ऑगस्टचे वेळापत्रक पहा

टेबल टेनिस

पुरुष : सांघिक राऊंड ऑफ 16 (शरथ कमल, हरमीत देसाई आणि मानव ठक्कर विरुद्ध चीन) ( दुपारी 1:30 वाजता)

ऍथलेटिक्स

पुरुष : नीरज चोप्रा ( पात्रता सामना) (दुपारी 1:50 वाजता) किशोर जेना ( पात्रता सामना)  (दुपारी 3:20 वाजता)

महिला : किरण पहल ( 400 मीटर रिपेचेज, हीट 1) (दुपारी 2:50 वाजता)

कुस्ती

महिला : विनेश फोगट (50 किलो फ्रीस्टाइल प्री-क्वार्टर फायनल) (दुपारी 3 वाजता)

टेबल टेनिस

महिला : क्वार्टर फायनल, श्रीजा अकुला, मनिका बत्रा आणि अर्चना कामथ विरुद्ध USA/जर्मनी (संध्याकाळी 6:30 वाजता )

Lakshya Sen : भारताला धक्का, लक्ष्य सेनचा पराभव, कांस्यपदक हुकले

हॉकी

पुरुष : सेमीफायनल विरुद्ध जर्मनी ( रात्री 10:30 वाजता)

50 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार?; शेख हसिना भारतात डेरेदाखल

follow us