शोएब आणि सानिया ‘तलाक’ नाही तर ‘खुला’ प्रथेने झालेत वेगळे : नेमकी काय आहे ही पद्धत?

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik). काही दिवसांपूर्वीपर्यंत भारताचा जावई अशी याची ओळख होती. 2010 मध्ये जेव्हा त्याने भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झासोबत (Saniya Mirza) निकाह केला. तेव्हा आजच्या सारखे व्हॉट्सअॅप आणि फेसबुकचा वापर वाढीव झाला नव्हता. पण तशामध्येही ते फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. यानंतर सानिया प्रचंड ट्रोलही झाली होती. (Shoaib Malik and Sania […]

Shoab Malik

Shoab Malik

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik). काही दिवसांपूर्वीपर्यंत भारताचा जावई अशी याची ओळख होती. 2010 मध्ये जेव्हा त्याने भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झासोबत (Saniya Mirza) निकाह केला. तेव्हा आजच्या सारखे व्हॉट्सअॅप आणि फेसबुकचा वापर वाढीव झाला नव्हता. पण तशामध्येही ते फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. यानंतर सानिया प्रचंड ट्रोलही झाली होती. (Shoaib Malik and Sania Mirza have separated from each other after ‘khula’)

तिने दुसऱ्या कोणत्याही देशातील मुलाशी निकाल केला असता तर एवढी ट्रोल झाली नसती, पण थेट पाकिस्तानच्या मुलासोबतच निकाह करण्याचे धाडस तिने दाखवले होते. आता याच शोएब मलिकने तिसऱ्यांदा निकाह केला आहे. पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी त्याने निकाह कुबूल केला. शोएबने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन या निकाहचे दोन फोटोही शेअर केले आहेत.

सानियाला घटस्फोट न देताच शोएब मलिकनं थाटला दुसरा संसार; अभिनेत्री सनासोबत बांधली लग्नगाठ

या फोटोंनंतर त्याने सानिया मिर्झाला तलाक न देताच हा निकाह केल्याची चर्चा आहे. कारण दोघांच्या तलाकच्या अधिकृत बातम्या कधीही समोर आल्या नव्हत्या. अशात आता सानियाचे वडील इम्रान मिर्झा यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, ते तलाकमधून नाही तर ‘खुला’ प्रथेतून वेगळे झाले आहेत. मिर्झा यांची ही प्रतिक्रिया प्रचंड व्हायरल होत आहे. नेमकी ही खुला प्रथा काय आहे, तलाक पेक्षा वेगळी आहे का? असे सवाल विचारले जात आहे.

नेमकी काय आहे ही प्रथा पाहुयात…

तलाक आणि खुला यात फारसा फरक नाही. ‘खुला’चा शाब्दिक अर्थ किंवा अरबी भाषेत “पूर्ववत करणे” असा अर्थ होतो. जेव्हा एखादी स्त्री निकाहचे बंधन स्वतः दूर करुन पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेते, तेव्हा त्याला ‘खुला’ म्हणतात. तर जेव्हा हा निर्णय पुरुषाच्या बाजूने होतो तेव्हा त्याला तलाक म्हणतात. खुलाची प्रथा वैवाहिक जीवनात नाखूष असलेल्या महिलांना सन्मान आणि प्रतिष्ठित पद्धतीने वेगळे होण्याचा पर्याय देते. कुराण आणि हदीसमध्येही याचा उल्लेख आहे. शोएब आणि सानियाच्या नात्यात सानियाने विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे दोघे तलाकमधून नाही तर खुला प्रथेतून वेगळे झाले आहेत.

2010 मध्ये झाला होता दोघांचा विवाह :

शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांचा विवाह 12 एप्रिल 2010 रोजी पारंपारिक पद्धतीने झाला होता. हैदराबादमध्ये हा सोहळा पार पडला होता. लग्नाच्या आठ वर्षानंतर म्हणजेच 2018 मध्ये दोघांनी मुलगा इझान याला जन्म दिला. मात्र गेल्या काही महिन्यांपासून एकत्र दिसत नव्हते. त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या. आता ते वेगळे झाल्याचे अधिकृतरित्या समोर आले आहे. इझान आता सानिया मिर्झासोबत राहतो.

ठरलं तर! या दिवशी येणार खिलाडी अन् टायगर श्रॉफच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’चा टिझर, सर्वांना उत्सुकता

शोएब अजूनही व्यावसायिक क्रिकेटमध्ये सक्रिय आहे, तर सानियाने गेल्या वर्षी टेनिसमधून निवृत्ती घेतली. सानिया मिर्झा ग्रँड डबल्समध्ये सहा वेळा चॅम्पियन ठरली आहे. याशिवाय दुहेरीत जिंकलेल्या सहा ग्रँडस्लॅम विजेतेपदांमध्ये तीन मिश्र दुहेरी आणि तितक्याच महिला दुहेरी विजेतेपदांचा समावेश आहे. 2016 मध्येही तिने ऑस्ट्रेलियन ओपन महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकून तिचे शेवटचे ग्रँडस्लॅम मिळवले होते.

कोण आहे सना जावेद?

शोएब मलिकची वधू सना जावेदची गणना पाकिस्तानच्या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये केली जाते. सना जावेदने 2012 मध्ये शहर-ए-जात या मालिकेद्वारे पडद्यावर पदार्पण केले होते. नंतर ती अनेक मालिकांमध्ये दिसली. ‘खानी’ या टेलिव्हिजन मालिकेत मुख्य भूमिका साकारल्यानंतर सनाला ओळख मिळाली. रुसवाई आणि डंक या सामाजिक नाटकांसाठी सना जावेदचे कौतुक झाले आहे. याशिवाय ती अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसली आहे.

Exit mobile version