सानिया मिर्झा घेणार टेनिसमधून निवृत्ती

सानिया मिर्झा घेणार टेनिसमधून निवृत्ती

मुंबई : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने एक मोठी घोषणा केली आहे. वास्तविक, सानियाने तिच्या व्यावसायिक टेनिस करिअरमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सानियाने तिच्या दुखापतीमुळे हा निर्णय घेतला आहे. सानियाच्या या निर्णयामुळे तिच्या चाहत्यांचीही मोठी निराशा झाली आहे.

भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाने आता टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. होय, सहा वेळा ग्रँडस्लॅम विजेती सानिया पुढील महिन्यात दुबईत होणाऱ्या टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेनंतर व्यावसायिक टेनिसला कायमचा निरोप देईल. टेनिस वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत तिने ही माहिती दिली.

सानियाने तीनदा महिला दुहेरीचे ग्रँडस्लॅम आणि तीन वेळा मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. निवृत्तीपूर्वी ती या महिन्यात ऑस्ट्रेलिया ओपनच्या दुहेरीत सहभागी होणार आहे. सानियाने तिच्या दुखापतीमुळे हा निर्णय घेतला आहे.

सानिया मिर्झा कारकीर्द
अर्जुन पुरस्कार (2004), पद्मश्री पुरस्कार (2006), राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार (2015) आणि पद्मभूषण पुरस्कार (2016) प्राप्तकर्ता देखील आहे. यासह सानियाने आतापर्यंत 6 मोठ्या चॅम्पियनशिपमध्ये पदके जिंकली आहेत. तिने ऑस्ट्रेलियन ओपन (2016), विम्बल्डन (2015) आणि यूएस ओपन (2015) दुहेरीत विजेतेपद पटकावले आहेत. याशिवाय तिने मिश्र दुहेरीत तीन ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन (2009), फ्रेंच ओपन (2012) आणि यूएस ओपन (2014) विजेतेपदेही जिंकली आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube