Team India Squad for T20 World Cup 2024 : यंदा टी 20 विश्वचषक जून महिन्यात अमेरिका आणि वेस्टइंडिज या देशांत होणार आहे. या स्पर्धेची (T20 World Cup) तयारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने केली आहे. संघनिवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. टीम इंडियाही 15 सदस्यीय (Team India) संघाची घोषणा लवकरच करू शकते. या घोषणेआधीच एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. संघ निवडीसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या बैठकीत उपकर्णधाराच्या नावावर निर्णय घेतला जाऊ शकतो. हार्दिक पांड्या संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी घेण्यास सक्षम आहे. परंतु, एका जुन्या खेळाडूची संघात एन्ट्री झाल्याने कदाचित हार्दिकचे नाव मागे पडू शकते.
T20 विश्वचषकासाठी किवींच्या 15 शिलेदारांची घोषणा; ‘या’ दिग्गज खेळाडूकडे सोपवली मोठी जबाबदारी
अपघातात जखमी झाल्याने ऋषभ पंत वर्षभर संघाच्या बाहेर होता. आता तो पुन्हा संघात परतला आहे. क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार या बैठकीत उपकर्णधाराच्या नावावर चर्चा होऊ शकते. सध्या हार्दिक पांड्या हे पद सांभाळत आहे. मात्र आता ऋषभ पंतच्या नावाचा विचार होऊ शकतो. याआधीही पंतने उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे या पदाचा त्याला अनुभव आहे.
पंत ज्यावेळी दिल्लीतून आपल्या घराकडे निघाला होता त्यावेळी दिल्ली-देहरादून महामार्गावर त्याचा कारचा अपघात झाला होता. या अपघातात पंत गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्याला चालताही येणे कठीण झाले होते. मात्र, त्याने मोठ्या हिंमतीने या दुखापतीवर मात केली. यानंतर तो नुकताच संघात परतला आहे. भारतात सुरू असलेल्या टी 20 लीग क्रिकेट स्पर्धेत तो खेळत आहे. या स्पर्धेतील संघातील खेळाडूंच्या कामगिरीवर संघ व्यवस्थापनाचे लक्ष आहे.
T20 World Cup : रोहित-विराटनंतर तिसऱ्या नंबरवर कोण? टीम इंडियाला मिळाला नवा पर्याय