T20 World Cup : रोहित-विराटनंतर तिसऱ्या नंबरवर कोण? टीम इंडियाला मिळाला नवा पर्याय
T20 World Cup 2024 Update : टी 20 विश्वचषक स्पर्धा जवळ येत आहे. या स्पर्धेसाठी अद्याप टीम इंडियातील खेळाडूंची निवड झालेली नाही. 15 सदस्यांच्या संघ निवडीसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 1 मे पर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी संघाची निवड होऊ शकते. आता या संघात कोणते खेळाडू असतील याची माहिती मिळालेली नाही. परंतु, संघात निवडीसाठी अनेक खेळाडूंनी दावेदारी केली आहे. यात आणखी एका फलंदाजाने दावा ठोकला आहे.
भारतात सध्या टी 20 क्रिकेट लीग स्पर्धा सुरू आहेत. तिसऱ्या नंबरवर फलंदाजी करताना साई सुदर्शनने चमकदार कामगिरी केली आहे. टी 20 लीग स्पर्धेत साई सुदर्शन चांगली कामगिरी करत आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सुदर्शन चौथ्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेतील नऊ सामन्यात त्याने 37.11 च्या सरासरीने 334 धावा केल्या आहेत.
Team India Australia Tour : टीम इंडिया-ऑस्ट्रेलियाच्या कसोटीसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाची मोठी घोषणा
विराट कोहली टी 20 विश्वचषकात सुरुवातीला खेळायला येऊ शकतो. जर असे झाले तर साई सुदर्शन तीन नंबरसाठी निवडकर्त्यांसमोर चांगला पर्याय ठरू शकेल. साई सुदर्शनाच्या खेळाचं वैशिष्ट्य म्हणजे तो संघाच्या डावाला स्थिरता प्रदान करतो आणि एका बाजूने विकेट पडू देत नाही. तीन नंबरवर फलंदाजीसाठी येणाऱ्या खेळाडूसाठी ही गोष्ट खूप महत्वाची आहे.
हार्दिक पांड्या महत्वाचा खेळाडू आहे. परंतु, तो सध्या वेगळ्याच कारणांनी चर्चेत आहे. टी 20 स्पर्धे त्याची आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. तरीदेखील संघात त्याची निवड होईल यात शंका नाही. तसेच विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रित बुमराह, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत, अर्शदीप सिंह, सिराज, कुलदीप यादव यांची निवड निश्चित मानली जात आहे.
शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांचा विचार केला तर गिलने सध्याच्या टी 20 स्पर्धेत फलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे. तर जैस्वालही सातत्याने चांगली कामगिरी करत आहे त्यामुळे त्याच्याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. या दोघांतून एकाची निवड करणे निवडकर्त्यांसाठी कसरतीचे ठरणार आहे. जर दोघांचीही निवड झाली तर रिंकू सिंह किंवा शिवम दुबे यांपैकी एका जणाचा पत्ता कट होऊ शकतो.
पंतची एन्ट्री, राहुलची वाट बिकट; T20 वर्ल्डकप संघात निवड कठीण; कारण काय?